मुंबई सोडून अनंत आणि राधिकाचे प्री-वेडिंग फंक्शन्स गुजरातमधील जामनगरमध्ये का? जाणून घ्या काय आहे कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2024 10:35 AM2024-03-01T10:35:59+5:302024-03-01T10:41:38+5:30

गुजरातमधील जामनगरमध्ये १ ते ३ मार्च दरम्यान अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा प्री-वेडिंग सोहळा पार पडणार आहे.

Anant Ambani-Radhika Merchant pre-wedding events : , Anant Ambani revealed the special reason wedding function to be held in Jamnagar | मुंबई सोडून अनंत आणि राधिकाचे प्री-वेडिंग फंक्शन्स गुजरातमधील जामनगरमध्ये का? जाणून घ्या काय आहे कारण

मुंबई सोडून अनंत आणि राधिकाचे प्री-वेडिंग फंक्शन्स गुजरातमधील जामनगरमध्ये का?

रिलायन्स साम्राज्याचा जगभरात विस्तार करणारे दिग्गज उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरी सध्या धाकट्या अनंत अंबानी यांच्या लाग्नाची जोरात तयारी सुरू आहे. गुजरातमधील जामनगरमध्ये १ ते ३ मार्च दरम्यान अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा प्री-वेडिंग सोहळा पार पडणार आहे.  प्री-वेडिंग फंक्शन्ससाठी गेल्या दोन दिवसांपासून देशी-विदेशी स्टार्स जामनगरमध्ये पोहचले आहेत. पण, यातच सर्वांना एकच प्रश्न पडला आहे की, मुंबई सोडून अनंत आणि राधिकाचे फंक्शन गुजरातमधील जामनगरमध्ये का आयोजित केले जात आहेत. तर याचा खुलासा खुद्द अनंत अंबानीने केला आहे.

टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, जामनगर हे अंबानी कुटुंबीयांच्या दृष्टीने खूप महत्त्वाचं आहे. कारण त्यांचे त्या शहराशी खूप दृढ असे कौटुंबिक बंध आहेत. अनंत अंबानीने सांगतिले की, आजीचा जन्म जामनगरमध्ये झाला आहे. याशिवाय आजोबा धीरूभाई अंबानी यांनी इथूनच व्यापाराला सुरुवात केली. तर माझ्या वडिलांनी जामनगरमध्येच आजोबांबरोबर काम केले आहे. मीदेखील जामनगरमध्ये लहानाचा मोठा झालो.  त्यामुळे जामनगर हे ठिकाण खूप आवडतं आहे. म्हणून जामनगरमध्ये या कार्यक्रमाचे आयोजन केले. 

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री वेडिंग फंक्शनकडे सर्वांच्या नजरा आहेत. फक्त देशच नाही तर विदेशातूनही लोक या प्री वेडिंग फंक्शनसाठी दाखल होत आहेत. या सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी शाहरुख खान, अमिताभ बच्चन, जान्हवी कपूर यांच्यासह  काही आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटी गुरुवारी जामनगरला पोहोचले. 

राधिका मर्चंट ही अनंत अंबानी याच्यापेक्षा वयाने मोठी आहे. राधिकाचा जन्म हा 18 डिसेंबर 1994 मध्ये झालाय. बिझनेसमॅन वीरेन मर्चंटची मुलगी राधिका आहे. राधिका मर्चंट आणि अनंत अंबानी दोघेही कॉलेजच्या दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत. यापूर्वी राधिका अंबानी कुटुंबाच्या अनेक फंक्शन्समध्ये झळकली आहे. गेल्या वर्षी दोघांचा साखरपुडा झाला होता, त्यानंतर आता जामनगरमध्ये प्री-वेडिंग आणि लग्न मुंबईत होणार आहे. 

Web Title: Anant Ambani-Radhika Merchant pre-wedding events : , Anant Ambani revealed the special reason wedding function to be held in Jamnagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.