​एमी जॅक्सनला लगीनघाई! अब्जाधीश बॉयफ्रेन्डशी बांधणार लग्नगाठ!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2018 15:13 IST2018-02-21T09:43:28+5:302018-02-21T15:13:28+5:30

हॉट अ‍ॅण्ड हॉटेस्ट अभिनेत्री एमी जॅक्सन लवकरच लग्न करणार असल्याची खबर आहे. गेल्या काही दिवसांपासून एमीच्या डेटींगच्या बातम्या चर्चेत ...

Amy Jackson to be hanged! Wedding match with billionaire boyfriend! | ​एमी जॅक्सनला लगीनघाई! अब्जाधीश बॉयफ्रेन्डशी बांधणार लग्नगाठ!!

​एमी जॅक्सनला लगीनघाई! अब्जाधीश बॉयफ्रेन्डशी बांधणार लग्नगाठ!!

ट अ‍ॅण्ड हॉटेस्ट अभिनेत्री एमी जॅक्सन लवकरच लग्न करणार असल्याची खबर आहे. गेल्या काही दिवसांपासून एमीच्या डेटींगच्या बातम्या चर्चेत आहेत. अब्जाधीश जॉर्ज पानायिटूसोबत एमी रिलेशनशिपमध्ये असल्याचे कळतेय. जॉर्ज हा ब्रिटीश प्रॉपर्टी डेव्हलपर अँड्स पानायिटूचा मुलगा आहे. जॉर्जचा ‘क्वीन सिटी’ नामक एक अलिशान नाईटक्लबही आहे.  एमीला डेट करण्यापूर्वी जॉर्ज पॉप गायिका शेरिल कोलला डेट करत होता. पण कालांतराने दोघांचेही ब्रेकअप झाले आणि जॉर्जला एमी मिळाली. सध्या जॉर्ज   एमीसोबत क्वॉलिटी टाईम घालवतो आहे. या दोघांचे फोटो सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत. एमीने स्वत: जॉर्जसोबतचे अनेक फोटो शेअर केले आहेत.



एमीच्या एका जवळच्या मित्राने दिलेल्या माहितीनुसार, ती व जॉर्ज दीर्घकाळापासून रिलेशनशिपमध्ये आहेत. जॉर्ज व एमी दोघेही एकमेकांसोबत अतिशय आनंदी आहेत आणि या वर्षांत लग्न करण्याचा त्यांचा विचार आहे. तूर्तास हे लग्न कधी व कुठे होणार, हे ठरलेले नाही. पण लवकरच ही तारीखही आपल्याला कळेल, अशी अपेक्षा आहे.

ALSO READ : ​सलमान नाही तर ‘मल्टी मिलेनियर प्लेबॉय’च्या प्रेमात वेडी झालीयं एमी जॅक्सन!!

   एकेकाळी एमी व प्रतीक बब्बर यांच्या अफेअरच्या चर्चा चांगल्याच रंगल्या होत्या. सलमान खानसोबतही तिचे नाव जोडले गेले होते. अर्थात २०१२ मध्ये दोघांचे ब्रेकअप झाले होते.   एमीने २०१२ मध्ये ‘एक दिवाना था’ या सिनेमातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. सिनेमात तिने राज बब्बर यांचा मुलगा प्रतीक बब्बर याच्याबरोबर स्क्रीन शेअर केली होती. त्यानंतर एमी ‘सिंग इज ब्लिंग’, ‘फ्रीकी अली’ या सिनेमांमध्ये दिसली होती. त्याचबरोबर २०१६ मध्ये  तिने ‘देवी’ या साउथ सिनेमामध्येही काम केले होते.  लवकरच एमीचा ‘2.0’ हा सिनेमा रिलीज होणार आहे. या चित्रपटात ती मेगास्टार रजनीकांत आणि अक्षय कुमारसोबत स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे.

Web Title: Amy Jackson to be hanged! Wedding match with billionaire boyfriend!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.