अमोल गुप्तेंच्या चित्रपटात दिसणारा नवा लहानगा स्टार!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2016 17:10 IST2016-11-09T17:10:40+5:302016-11-09T17:10:40+5:30
दिग्दर्शक अमोल गुप्ते यांच्या आगामी चित्रपटातून नवा लहानगा स्टार बॉलिवूडमध्ये पदार्पणास सज्ज झाला आहे. हा स्टारचे नाव सनी गिल ...

अमोल गुप्तेंच्या चित्रपटात दिसणारा नवा लहानगा स्टार!
अमोल गुप्ते बालकांच्या भावविश्वावर आधारित चित्रपटांच्या निर्मितीसाठी ओळखले जातात. अमोलने ‘तारे जमीन पर’ व ‘स्टॅनली का डब्बा’ यासारख्या दर्जेदार चित्रपटांची निर्मिती केली आहे. या दोन्ही चित्रपटांनी क्रिटीक्सची चांगलीच प्रसंशा मिळविली होती. ‘तारे जमीन पर’ या चित्रपटात आमिर खानची प्रमुख भूमिका होती. हा चित्रपट आमिरच्या सर्वोत्कृष्ठ चित्रपटात सामील केला जातो. ‘तारे जमीन पर’ मधून दर्शिल सफारी या बाल कलाकाराने बॉलिवूडमध्ये एंट्री केली होती. त्याच्याकडून उत्कृष्ठ अभिनय अमोलने करून घेतला होता.
यानंतर प्रदर्शित झालेल्या ‘स्टॅनली का डब्बा’ या चित्रपटात त्याने स्वत:चा मुलगा पार्थो याला संधी दिली होती. अमोलने स्वत: यात प्रमुख भूमिका साकारली होती. बाप-लेकाच्या या जोडीने चांगलीच प्रशंसा मिळविली होती. दोन चित्रपटानंतर अमोल पुन्हा एकदा एका नव्या बालकलाकाराची बॉलिवूडमध्ये एंट्री मिळवून देतो आहे. त्याच्या आगामी ‘स्निफ’ या चित्रपटातून सनी गिल हा बालकलाकार बॉलिवूडमध्ये एंट्री करणार आहे.
‘स्निफ’ या बालपटातून सनी गिल अनेक कारनामे करताना दिसणार आहे. हा चित्रपटातून गुप्तहेर-सुपरहिरोची कथा दाखविली जाणार आहे. एक शिख मुलगा आपल्या टोळीसोबत मस्तीसोबतच अनेक गुढ रहस्यांवरून पडदा उचलणार असल्याचे दाखविण्यात येणार असल्याचे सांगण्यात येते.
हा चित्रपट पारंपारिक बालपटांसारखा नाही. या चित्रपटातून अनेक नव्या गोष्टी तुम्हाला पहावयास मिळणार असल्याचे ट्रिनिटी पिक्चर्सचे प्रमुख अजित ठाकूर यांनी सांगितले.