अमिताभ यांनी लाईव्ह चाटच्या माध्यमातून साधला संवाद
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2016 21:56 IST2016-12-09T21:56:59+5:302016-12-09T21:56:59+5:30
बॉलिवूडमधील आघाडीचे कलावंत आजकाल सोशल मीडियाचा चांगलाच वापर करू लागले आहेत. ट्विटर, फसेबुकवर बहुतेक सर्व सेलिब्रेटींचे अकाऊंट आहेत. आपल्या ...
.jpg)
अमिताभ यांनी लाईव्ह चाटच्या माध्यमातून साधला संवाद
अमिताभ बच्चन यांचे लाइव्ह फेसबुक चॅटबद्दल त्यांच्या चाहत्यांत खूप उत्सुकता होती. यामुळे त्यांच्यावर चाहत्यांनी प्रश्नांचा मारा केला. तुमचे आगामी प्रोजेक्ट कोणते यापासून ते थेट मधुशालाच्या काव्यवाचनापर्यंतच्या नानाविध विषयांना त्यांच्या चाहत्यांनी हात घातला. एका चाहत्याने ‘तुमचे डिजिटायजेशनबद्दल मत काय’ असा प्रश्न त्यांना विचारला. यावर अमिताभ म्हणाले, या नव्या तंत्रज्ञानामुळेच तर आपण एकमेकांच्या थेट संपर्कात येऊ शकलो असे उत्तर दिले.
अमिताभ यांनी आपल्या लाईव्ह चाटची सुरुवात तामीळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जयललीता यांच्या आठवणींना उजाळा देत केली. ते म्हणाले, भारतीय सिनेमाला १०० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने जयललितांनी एक कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यांनी भारतीय सिनेमाचा गौरव यामाध्यमातून केला होता. त्याचा तो कार्यक्रम कायम माझ्या स्मरणात राहणार असल्याचे त्यानी सांगितले.
प्रसिद्ध चित्रकार एम. एफ. हुसैन यांचे पेंटिंग दाखवून ते म्हणाले, मी दवाखाण्यात दाखल असताना काही ओळी मी लिहिल्या होत्या. हीच संकल्पना वापरुन एम.एफ.हुसैन यांनी एक चित्र काढून मला ते भेट दिल्याचे अमिताभ यांनी म्हटले. हुसैन यांना घोडे खूप आवडत असत म्हणून त्यांनी या चित्रातही घोडे काढले असे अमिताभ म्हणाले. अफगाणिस्तान, पाकिस्तान, कॅनडा अशा वेगवेगळ्या देशांमधून लोकांनी त्यांना शुभेच्छा आणि प्रश्ने पाठवली होती. त्या प्रश्नांना त्यांनी अत्यंत संयमाने उत्तरे दिली.