​‘जग्गा जासूस’ पाहून अमिताभ बच्चन झालेत रणबीर कपूरचे ‘फॅन’!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2017 14:32 IST2017-07-17T09:02:18+5:302017-07-17T14:32:18+5:30

गत शुक्रवारी रणबीर कपूर व कॅटरिना कैफ या दोघांचा ‘जग्गा जासूस’ हा सिनेमा प्रदर्शित झाला. बॉक्सआॅफिसवर पहिल्या दोन दिवसांत ...

Amitabh Bachchan, Ranbir Kapoor's 'Fan' after watching 'Jagga Detective'! | ​‘जग्गा जासूस’ पाहून अमिताभ बच्चन झालेत रणबीर कपूरचे ‘फॅन’!

​‘जग्गा जासूस’ पाहून अमिताभ बच्चन झालेत रणबीर कपूरचे ‘फॅन’!

शुक्रवारी रणबीर कपूर व कॅटरिना कैफ या दोघांचा ‘जग्गा जासूस’ हा सिनेमा प्रदर्शित झाला. बॉक्सआॅफिसवर पहिल्या दोन दिवसांत चित्रपटाला फार चांगली ओपनिंग मिळाली नाही. पण हळूहळू प्रेक्षकांना हा चित्रपट आवडल्याचे दिसतेय. बॉक्सआॅफिसचे आकडे तूर्तास तरी हेच सांगताहेत. सर्वाधिक प्रशंसा होतेय, ती रणबीर कपूरच्या कामाची. आता तर रणबीरच्या फॅन लिस्टमध्ये महानायक अमिताभ बच्चनही सामील झाले आहेत. होय, सीनिअर बच्चननी रणबीरचा ‘जग्गा जासूस’ पाहिला आणि त्यांना हा चित्रपट मनापासून आवडला आहे. रणबीरचा अभिनय आणि अनुराग बसूचे दिग्दर्शन दोघांचेही त्यांनी मनापासून कौतुक केले आहे. 

{{{{twitter_post_id####}}}}



twitterवर अमिताभ यांनी आपला हा अभिप्राय कळवला आहे. ‘आत्ताच ‘जग्गा जासूस’ पाहिला. अनुरागने किती मनोहारी आणि उत्तम चित्रपट बनवला आहे. पाहताना मज्जा आली,’ असे त्यांनी लिहिले. रणबीरचेही त्यांनी कौतुक केले. रणबीर अलीकडे योग्य चित्रपटांची निवड करू लागला आहे. रणबीरचे यश पाहून त्याची आई नीतू सिंह यांना नक्कीच अभिमान वाटत असावा, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे. ‘परम सुख, जब बच्चा अपनी कामयाबी से पॅरेंट्स को गौरान्वित करता है,’ असे इन्स्टाग्रामवर त्यांनी लिहिले आहे.
‘ऐ दिल है मुश्किल’नंतर रणबीरचा ‘जग्गा जासूस’ रिलीज झाला. या चित्रपटात त्याच्यासोबत त्याची एक्स गर्लफ्रेन्ड कॅटरिना कैफही आहे. रिलीजच्या पहिल्या दिवशी या चित्रपटाने ८.५७ कोटी रूपयांची कमाई केली. दुसºया दिवशी म्हणजे गत शनिवारी ११.५४५ कोटी तर तिसºया दिवशी १३ कोटी रूपयांचा गल्ला जमवला. आत्तापर्यंत चित्रपटाने एकूण ३३.१७ कोटी रुपए कमावले.

Web Title: Amitabh Bachchan, Ranbir Kapoor's 'Fan' after watching 'Jagga Detective'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.