आमीर जाणार या रिसेप्शनला
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2016 13:49 IST2016-12-06T13:49:19+5:302016-12-06T13:49:19+5:30
अभिनेता आमीर खान सध्या त्याच्या आगामी दंगल या चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आहे. आमीरचा या चित्रपटातील एकुणच अंदाज पाहता नक्कीच ...
.jpg)
आमीर जाणार या रिसेप्शनला
अ िनेता आमीर खान सध्या त्याच्या आगामी दंगल या चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आहे. आमीरचा या चित्रपटातील एकुणच अंदाज पाहता नक्कीच या चित्रपटाकडून त्याच्या चाहत्यांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. परंतू या चित्रपटाच्या प्रमोशनमधुन वेळ काढून आमंीर केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांच्या मुलीच्या लग्नाच्या रिसेप्शनमध्ये हजेरी लावणार असल्याचे कळतेय. नितीन गडकरी यांनी स्वत: या लग्नाच्या रिसेप्शनसाठी आमीरला खास निमंत्रण दिल्याचे समजतेय. दिल्लीमध्ये होणारा हा रिसेप्शन सोहळा भव्य-दिव्य स्वरुपात पार पडणार असल्याचे देखील बोलले जात आहे. तसेच आमीर देखील या कार्यक्रमाला हजेरी लावणार असल्याचे सुत्रांकडून सांगण्यात येत आहे. नुकतीच नितीन गडकरी यांची मुलगी केतकीचा विवाह नागपुरमध्ये अतिशय थाटामाटात पार पडला. या सोहळ््याला अनेक राजकिय क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती दर्शविली होती. जवळपास २००० पाहूण्यांचे यावेळी पारंपारिक रितीने स्वागत करण्यात आल्याचे समजतेय. आता आमीर खानची या रिसेप्शनला असणारी उपस्थिती नक्कीच सर्वांचे लक्ष वेधून घेणार आहे. आमीर या कार्यक्रमाला त्याच्या कूटूंबासोबत येणार कि एकटाच दिसणार हे मात्र अजुनतरी समजलेले नाही. या रिसेप्शन सोहळ््याला अनेक दिग्गज लोक येणार असल्याचे बोलले जात अहे. बरेचसे चित्रपटसृष्टीतील कलाकार देखील दिसण्याची श्क्यता वर्तविली जात आहे. दिल्लीमध्ये होणारा हा रिसेप्शन सोहळा कलाकार, राजकिय नेते आणि बºयाचशा सेलिब्रिटीजच्या झगमगाटात पार पडणार असल्याचे कळतेय.