पहाटे तीन वाजता घरी पोहोचली आलिया भट्ट आणि मग झाले असे काही...!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2017 11:22 IST2017-04-19T05:52:13+5:302017-04-19T11:22:13+5:30

बॉलिवूड आणि लेट नाईट पार्टी यांचा जुना संबंध आहे. हे दोन्ही एकमेकांपासून वेगळे होऊच शकत नाहीत, असेच म्हटले पाहिजे. ...

Alia Bhatt reached home at three o'clock in the morning, and then something happened ...! | पहाटे तीन वाजता घरी पोहोचली आलिया भट्ट आणि मग झाले असे काही...!

पहाटे तीन वाजता घरी पोहोचली आलिया भट्ट आणि मग झाले असे काही...!

लिवूड आणि लेट नाईट पार्टी यांचा जुना संबंध आहे. हे दोन्ही एकमेकांपासून वेगळे होऊच शकत नाहीत, असेच म्हटले पाहिजे. १२ ठोक्याला बॉलिवूडच्या पार्ट्या जेमतेम सुरु होतात आणि मग पहाटेपर्यंत रंगतात.  बॉलिवूडची चुलबुली गर्ल आलिया भट्ट हिने अशाच एका लेट नाईट पार्टीला अलीकडे हजेरी लावली. पार्टी मस्तपैकी रंगली. आलियानेही या पार्टीत मस्तपैकी धम्माल मस्ती केली. रात्री उशीरा ३ वाजता पार्टी करून आलिया घरी परतली, तेव्हा आलियाच्या आईचा राग अनावर झाला होता. राग इतका की, आलियाच्या आईने आलियाच्या बॉडीगार्डला नोकरीवरून काढून टाकेल. आता आलियाच्या उशीरा येण्याचा आणि बॉडीगार्डला नोकरीवरून काढण्याचा काय संबध, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर सविस्तर प्रकरण वाचा...

त्या दिवशी आलिया तिचा कथित बॉयफ्रेन्ड सिद्धार्थ मल्होत्राच्या घरी गेली होती. आलिया सिद्धार्थच्या  घरी पोहोचली आणि तिने तिचा ड्रायव्हर आणि बॉडीगार्ड दोघांनाही तिथेच थांबायला सांगितले. पण हे दोघेही काही वेळातच गायब झालेत. आलियाने स्टाफला कॉल केल्यावर ड्रायव्हर परत आला. पण अनेक कॉल्स केल्यानंतरही बॉडीगार्डचा काहीही थांगपत्ता लागेना. अखेर बºयाच वेळ प्रतीक्षा केल्यानंतर आलिया घरी जाण्यासाठी निघाली, तर  बॉडीगार्ड अचानक तिच्या समोर आला. त्याने तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. पण आलिया लगेच सावध झाली. कारण बॉडीगार्ड मद्याच्या नशेत होता. मग काय, आलियाने बॉडीगार्डशिवायच घरी पोहोचली. घरी पोहोचताच तिने हा सगळा किस्सा आईला सांगितला. याचा परिणाम म्हणजे, आलियाच्या आईने बॉडीगार्डची नोकरीवरून हकालपट्टी केली. मी नशेत नव्हतो, असे बॉडीगार्ड शेवटपर्यंत सांगत होता. पण आलियाची आई काहीही ऐकण्याच्या मूडमध्ये नव्हती.

ALSO READ : आलिया भट्ट बनणार का अखिल अक्किनेनीची हिरोईन?

गत महिन्यातच महेश भट्ट यांना एका अज्ञान इसमाने फोन केला होता. मी उत्तर प्रदेशचा डॉन बबलू श्रीवास्तव असल्याचे सांगत या व्यक्तिने ५० लाख रूपयांची खंडणी मागितली होती आणि ती न दिल्यास आलियाला जीवे मारण्याची धमकी दिली होती. यानंतर गत २ मार्च पोलिसांनी महेश भट्ट यांना धमकी देणाºया या आरोपीस अटक केली होती.

Web Title: Alia Bhatt reached home at three o'clock in the morning, and then something happened ...!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.