बॉयफ्रेंड सिद्धार्थ मल्होत्रासोबत काम करण्यास उत्सुक नाही आलिया भट्ट?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2017 16:13 IST2017-08-11T10:38:13+5:302017-08-11T16:13:06+5:30

बॉलिवूडमधले हॉट कपल असलेले आलिया भट्ट आणि सिद्धार्थ मल्होत्रा लवकरच आशिकी-3 मध्ये स्क्रिन शेअर करताना दिसणार आहेत. ही गोष्ट ...

Alia Bhatt is not keen to work with boyfriend Siddharth Malhotra? | बॉयफ्रेंड सिद्धार्थ मल्होत्रासोबत काम करण्यास उत्सुक नाही आलिया भट्ट?

बॉयफ्रेंड सिद्धार्थ मल्होत्रासोबत काम करण्यास उत्सुक नाही आलिया भट्ट?

लिवूडमधले हॉट कपल असलेले आलिया भट्ट आणि सिद्धार्थ मल्होत्रा लवकरच आशिकी-3 मध्ये स्क्रिन शेअर करताना दिसणार आहेत. ही गोष्ट कंन्फर्मपण झाली होती मात्र आता कहानीत एक नवा ट्वीस्ट आला आहे. आलिया आपला कथित बॉयफ्रेंड सिद्धार्थ मल्होत्रासोबत काम करण्यास फारशी उत्सुक नसल्याचे कळते आहे. मुंबई मिररच्या वृत्तनुसार आलिया भट्ट सिद्धार्थ मल्होत्रासोबत आशिक-3 मध्ये स्क्रिन शेअर करण्यासाठी जेवढी एक्सायटेड असायला हवी होती तेवढी नाहीय. दिग्दर्शक मोहित सूरीचा आशिकी चित्रपटाचा तीसरा सीक्वल तयार करण्यात येणार आहे. 'स्टुंडट ऑफ द इअर' आणि 'कपूर एन्ड सन्स' नंतर सिद्धार्थ आणि आलियाचा हा तिसरा चित्रपट आहे. आलिया भट्ट सध्या राजीच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. राजीमध्ये ती एक महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. यात तो काश्मीरी मुलीची भूमिका साकारणार आहे. जिचे लग्न आणि एका पाकिस्तानी आर्मी अधिकाऱ्याशी होते. यात आलियाच्या नवऱ्य़ाची भूमिका मसान फेम विकी कौशल साकारतो आहे. काही दिवसांपूर्वी राजीच्या सेटवरचे शूटिंग दरम्यानचे फोटो लीक झाले होते. त्यावेळी चित्रपटाची दिग्दर्शिका मेघना गुलजार काहीशी नाराज झाली होती. याचित्रपटाची शूटिंग, पंजाब, मुंबईमध्ये होणार आहे. हा चित्रपट हरिंदर सिक्का यांच्या कॉलिंग सहमत या कादंबरीवर आधारित आहे. 11 मे 2018 ला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.  तर सध्या सिद्धार्थ मल्होत्रा 'ए जेंटलमॅन'मध्ये व्यस्त आहे. यात त्याचा डबल रोल आहे. त्याच्यासह याचित्रपटात जॅकलीन फर्णांडिस दिसणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर आणि गाणी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहेत. 

ALSO READ :   उडता पंजाबसाठी शाहिद कपूरला होकार द्यायला आलिया भट्टने घेतला एक वर्षांचा कालावधी!

Web Title: Alia Bhatt is not keen to work with boyfriend Siddharth Malhotra?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.