‘बद्रीनाथ की दुल्हनिया’चे सक्सेस एन्जॉय करण्यासाठी लंडनमध्ये पोहचली आलिया भट्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2017 22:08 IST2017-03-31T16:38:05+5:302017-03-31T22:08:05+5:30

Alia Bhatt arrives in London to enjoy Badrinath's bride's succession | ‘बद्रीनाथ की दुल्हनिया’चे सक्सेस एन्जॉय करण्यासाठी लंडनमध्ये पोहचली आलिया भट्ट

‘बद्रीनाथ की दुल्हनिया’चे सक्सेस एन्जॉय करण्यासाठी लंडनमध्ये पोहचली आलिया भट्ट

िनेत्री आलिया भट्ट आणि वरुण धवन यांचा ‘बद्रीनाथ की दुल्हनिया’ या चित्रपटाने बॉक्स आॅफिसवर १०० कोटी रुपयांपेक्षा अधिक गल्ला जमविला आहे. त्यामुळेच चित्रपटाचे सक्सेस एन्जॉय करण्यासाठी आलिया सध्या इंडस्ट्रीपासून थोडे दूर जात लंडनला पोहचली आहे. त्यामुळे आता आलियाला पुन्हा सेटवर पोहचण्यासाठी आणखी थोडा वेळ लागेल हे नक्की. 

आलियाने गेल्या काही दिवसांपूर्वीच स्पष्ट केले होते की, तिला चित्रपटांपासून आता सहा महिन्यांचा ब्रेक घ्यायचा आहे. फॅमिली आणि फ्रेण्ड सर्कलसोबत क्वॉलिटी टाइम घालविण्यासाठीच तिने हा सुट्यांचा प्लॅन केला होता. त्यातच तिच्या ‘बद्रीनाथ की दुल्हनिया’ या चित्रपटाने बॉक्स आॅफिसवर चांगले यश मिळवल्याने तिला सुट्या एन्जॉय करण्याचे दुहेरी निमित्तच मिळाले आहे. 


त्यामुळे ती सध्या लंडन येथे पोहचली आहे. होय, सध्या आलिया लंडनमध्ये शॉपिंग आणि सुट्या एन्जॉय करताना बघावयास मिळत आहे. आलियाच्या एका जवळच्या सूत्रांनी सांगितले की, आलिया काही काळासाठी एका टूरचे नियोजन करीत होती. त्यानुसार ती लंडनला पोहचली आहे. त्याठिकाणी तिचे काही मित्र असून, त्यांच्याकडे आलिया तब्बल एक आठवडा मुक्कामी थांबणार आहे. 

Web Title: Alia Bhatt arrives in London to enjoy Badrinath's bride's succession

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.