न्यूयॉर्कमध्ये रणबीर कपूरसोबत शॉपिंग करताना दिसली आलिया भट्ट, हातात हात घालत काढला फोटो!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2018 13:08 IST2018-10-18T13:03:01+5:302018-10-18T13:08:17+5:30
रणबीर कपूर सध्या न्यूयॉर्कमध्ये आहे कारण रणबीरचे वडिल ऋषी कपूर यांच्यावर न्यूयॉर्कमध्ये उपचार सुरु आहेत. त्यांची काळजी घेण्यासाठी आई नीतू कपूरसोबत रणबीरही तिकडचे आहे.

न्यूयॉर्कमध्ये रणबीर कपूरसोबत शॉपिंग करताना दिसली आलिया भट्ट, हातात हात घालत काढला फोटो!
रणबीर कपूर सध्या न्यूयॉर्कमध्ये आहे कारण रणबीरचे वडिल ऋषी कपूर यांच्यावर न्यूयॉर्कमध्ये उपचार सुरु आहेत. त्यांची काळजी घेण्यासाठी आई नीतू कपूरसोबत रणबीरही तिकडचे आहे. रणबीरच्या पाठोपाठ त्याची गर्लफ्रेंड आलिया भट्ट देखील न्यूयॉर्कमध्ये पोहोचली आहे.
नुकतेच न्यूयॉर्कच्या रस्त्यावर आलिया भट्टचे फिरतानाचे फोटो समोर आले आहेत. आलिया एका समजूतदार गर्लफ्रेंडप्रमाणे रणबीरच्या कठीण वेळेत त्याच्यासोबत उभी आहे. रणबीर आणि आलियाचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या फोटोमध्ये आलिया आणि रणबीरच्या हातात शॉपिंग केलेल्या बॅग्ज दिसत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार कपूर आणि भट्ट परिवारने दोघांचे लग्न फिक्स केले आहे. 2020मध्ये हे कपल लग्नाच्या बेडीत अडकणार आहे तोपर्यंत दोघे आपले प्रोजेक्ट्स पूर्ण करणार आहेत.
प्रियांका पण सध्या न्यूयॉर्कमध्ये आहे. आलिया प्रियांकाचीदेखील भेट घेतली. दोघींचे एकत्र फिरतानाचे फोटोसमोर आले आहेत. या फोटोमध्ये रणबीर मात्र कुठे दिसत नाही आहे. आलिया प्रियांका -निकच्या रोका सेरेमनीमध्ये सुद्धा दिसली होती.
आलिया भट्ट आणि रणबीर कपूरएकमेकांना डेट करताहेत, हे कुणापासूनही लपून राहिलेले नाही. आलियाचा आई सोनी राजदान ही सुद्धा रणबीरची फॅन आहे. आलिया व रणबीर दोघे पहिल्यांदाच ‘ब्रह्मास्त्र’ सिनेमात एकत्र दिसणार आहेत. या सिनेमाच्चिया शूटिंगदरम्यानच दोघांच्या मैत्रीचे प्रेमात रुपांतर झाले.