आलियाला शाहरूखचा असाही सल्ला?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2016 15:40 IST2016-10-25T15:40:59+5:302016-10-25T15:40:59+5:30

‘ आय अ‍ॅम शुअर, तुम इससे अच्छे जोक्स कर सकती हो कायरा,’ असे म्हणत तिचीच गुगली करतो.

Alia also advised Shahrukh? | आलियाला शाहरूखचा असाही सल्ला?

आलियाला शाहरूखचा असाही सल्ला?

र्षक वाचून विचारात पडलात ना की, आलिया भट्टला शाहरूखने काय सल्ला दिला असेल तो? थोडासा डोक्यावर ताण दिल्यावर लक्षात येईल की, आलियाला म्हणे, विनोद करणंच जमत नाही. त्यामुळे शाहरूखने तिला चांगला विनोद करण्याचा सल्ला दिलाय.

‘डिअर जिंदगी’ चित्रपटाच्या ‘टेक २’ मध्ये आलिया शाहरूखवर दोनदा जोक्स मारत त्याची फिरकी घेतांना दिसते. पण शाहरूख तिच्या या जोक्सवर हसणे तर दूर उलट तिला सल्ला देऊन मोकळ होतो. आलियाच्या फसलेल्या जोक्सवर न हसता शाहरूख तेवढ्याच शांतपणे तिला ‘कायरा, यू कॅन क्रॅक बेटर जोक्स..,’असे म्हणतो. चित्रपटाच्या ‘टिझर २’मध्ये ती त्याच्या ‘जग’ या टोपण नावावर हसते अन ‘एक ग्लास पानी मिलेगा फ्रॉम दॅट जग, जग,’असा जोक्स मारते. पण शाहरूख या जोक्स जराही न हसता उलट ,‘ आय अ‍ॅम शुअर, तुम इससे अच्छे जोक्स कर सकती हो कायरा,’ असे म्हणत तिचीच गुगली करतो. 

‘डिअर जिंदगी’ चित्रपटामध्ये शाहरूख-आलिया प्रथमच एकत्र काम करताना दिसणार आहेत. या चित्रपटात किंग खान ‘जहांगीर खान’ची तर आलिया ‘कायरा’ नावाच्या निमार्तीची भूमिका साकारतेय. शाहरूख-आलिया यांची ही जोडी चाहत्यांना हसवण्यासाठी केव्हा येतेय याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

">http://

Web Title: Alia also advised Shahrukh?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.