आता अली जफरच्या भावाचे फिल्मी करिअर गोत्यात!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2016 10:06 AM2016-10-20T10:06:44+5:302016-10-20T10:46:16+5:30

बॉलीवूडमध्ये सध्या पाकिस्तानी कलाकारांविषयी असणारी भावना पाहता अनेक जणांचे धाबे दणाणले आहेत. निमार्ता संघटनेने पाक कलाकारांवर बंदी घातल्यामुळे आता ...

Ali Zafar's brother's film career now! | आता अली जफरच्या भावाचे फिल्मी करिअर गोत्यात!

आता अली जफरच्या भावाचे फिल्मी करिअर गोत्यात!

googlenewsNext
लीवूडमध्ये सध्या पाकिस्तानी कलाकारांविषयी असणारी भावना पाहता अनेक जणांचे धाबे दणाणले आहेत. निमार्ता संघटनेने पाक कलाकारांवर बंदी घातल्यामुळे आता बऱ्याच निर्माते-दिग्दर्शकांची गोची झाली आहे. याचा तोटा केवळ फवाद खानसारख्या प्रस्थापित अभिनेत्यांनाचा नाही तर आगामी काळात हिंदी चित्रपटसृष्टीत येऊ पाहणाऱ्या नव पाकिस्तानी कलाकारांनासुद्धा झाला आहे.

आता अली जफरचा भाऊ डॅनियलचेच उदाहरण घ्या ना. यशराज बॅनरच्या आगामी सिनेमातून डॅनियल बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार होता. मात्र, आता त्याचे हे स्वप्न पूर्ण होऊ शकणार नाही असे दिसतेय. सध्या तापलेले वातावरण पाहून तो लाहोरला परतला असून त्याच्या फिल्म करिअरवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

हबीब फैसल दिग्दर्शित या सिनेमात पाच नवीन कलाकार सादर केले जाणार आहेत. कैद्याच्या जीवनाविषयी आधारित या सिनेमात २० वर्षीय डॅनियल रोमॅण्टिक लीड करत आहे. नोव्हेंबर महिन्यापासून शूटींग सुरू होणार असल्यामुळे त्याची जोरदारी तयारीदेखील सुरू होती.

Danyal Zafar
डॅनियल जफर

भारतातील वातावरण पाहता डॅनियलचे घरचे त्याला सध्या तरी मुंबईला येऊ देणार नाहीत अशी माहिती मिळतेय. त्यामुळे निर्मात्यांसमोर मोठा अडचण निर्माण झाली आहे. सकारात्मक गोष्ट म्हणजे शूटींग अद्याप सुरू न झाल्यामुळे ते त्याच्याऐवजी नवीन अभिनेत्याला संधी देण्याचा विचार करत आहेत. चित्रपटाच्या जवळच्या सुत्रांनुसार, नवीन कलाकार शोधण्याचा निर्णय घेतला तर शूटींग लांबणीवर जाईल.

डॅनियलचे बॉलीवूड डेब्यूचे स्वप्न पूर्ण होणार की त्याला आणखी वाट पाहावी लागणार हे आगामी काळात कळलेच. तत्पूर्वी अली जफरचा आगामी सिनेमा ‘डिअर जिंदगी’सुद्धा या वादामुळे अडचणीत आलेला आहे. आता दोन्ही भावांकडे लवकरात लवकर तणाव निवळण्यासाठी प्रार्थना करण्या व्यतिक्ति काही पर्याय नाही.

Web Title: Ali Zafar's brother's film career now!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.