अक्षय कुमारच्या मनात या गोष्टीची आहे खंत.. या मागचे कारण आहे सलमान खान
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2017 12:32 IST2017-12-23T06:53:48+5:302017-12-23T12:32:40+5:30
अक्षय कुमारचा चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातला होता. येणाऱ्या वर्षात अक्षय कुमारचे एका पेक्षा एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला ...

अक्षय कुमारच्या मनात या गोष्टीची आहे खंत.. या मागचे कारण आहे सलमान खान
अ ्षय कुमारचा चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातला होता. येणाऱ्या वर्षात अक्षय कुमारचे एका पेक्षा एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. ऐवढे सगळं सुरळीत सुरु असतानाही अक्षय कुमारच्या मनात एक गोष्टीची खंत आहे. ती अशी की अक्षय कुमाराला सुपरस्टार सलमान खानसोबत काम करायचे होते. मात्र केसरीमध्ये ते एकत्र काम करु शकले नाही. अक्षय कुमार केसरीमध्ये काम करणार होता तर या चित्रपटाची निर्मिती करण जोहरसोबत सलमान खान करणार होता. एका कार्यक्रमाच्या वेळी अक्षयला सलमानने चित्रपटातून माघार घेतल्या संदर्भात प्रश्न विचारण्यात आला. यावर अक्षय म्हणाला की, हो असे होऊ शकले नाही. मी आणि कऱण जोहर हा चित्रपट तयार करतो आहे. चित्रपटाचे शीर्षक केसरी ठेवण्यात आलेले आहे. जानवारी महिन्यापासून या चित्रपटाचे काम सुरु करणार आहोत. पॅडमॅनच्या रिलीजनंतर या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहोत.
हा चित्रपट सारागढीच्या संघर्षावर आधारित आहे. 26 जानेवारी 2019ला हा चित्रपट रिलीज होणार आहे. येत्या 26 जानेवारीला अक्षय कुमारचा पॅडमॅन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पॅडमॅनमध्ये अक्षयसोबत राधिका आपटे आणि सोनम कपूर असणार आहे. केवळ इतकेच नाही तर, या चित्रपटासोबत अक्षयची पत्नी टिष्ट्वंकल खन्ना निर्मिती क्षेत्रात पाऊल ठेवतेय. हा चित्रपट टिष्ट्वंकलने प्रोड्यूस केलेला आहे. चित्रपटात राधिका अक्षयच्या पत्नीच्या भूमिकेत असेल; तर सोनम अक्षयची लव्ह इंट्रेस्ट असेल. महानायक अमिताभ बच्चन हेदेखील चित्रपटात भूमिका साकारताना बघावयास मिळणार आहेत. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये अक्षय वेगवेगळ्या पद्धतीने पॅड बनवताना दिसत आहे. पण हा त्याचा प्रयोग त्याच्या पत्नीला म्हणजेच राधिका आपटेला रुचलेला नाहीये. त्यामुळे त्याची पत्नी त्याला सोडून निघून गेल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे तर सोनम त्याला या त्याच्या प्रयोगात मदत करताना आपल्याला दिसत आहे.‘पॅडमॅन’ हा चित्रपट अरुणाचलम मुरुगनाथम यांच्या जीवनाचा संघर्ष व स्वस्त सॅनिटरी पॅड तयार करण्यासाठी त्यांनी घेतलेली मेहनत दाखविण्यात येणार आहे.
ALSO READ : बॉक्स ऑफिसवर पॅडमॅन आणि अय्यारीचा होणार सामना