​‘द वॅम्प्स’ गाणार अजयच्या ‘शिवाय’साठी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2016 11:37 IST2016-09-08T06:07:28+5:302016-09-08T11:37:28+5:30

येत्या दिवाळीत ‘शिवाय’ वि. ‘ए दिल है मुश्किल’ या दोन सिनेमांची बॉक्स आॅफिसवर होणारी टक्कर म्हणजे सर्वात मोठी आतषबाजी ...

Ajay's 'Forward' song for 'The Vampes' | ​‘द वॅम्प्स’ गाणार अजयच्या ‘शिवाय’साठी

​‘द वॅम्प्स’ गाणार अजयच्या ‘शिवाय’साठी

त्या दिवाळीत ‘शिवाय’ वि. ‘ए दिल है मुश्किल’ या दोन सिनेमांची बॉक्स आॅफिसवर होणारी टक्कर म्हणजे सर्वात मोठी आतषबाजी ठरणार यात काही शंका नाही. अरिजित सिंगच्या जादुई आवाजातील ‘ए दिल...’च्या टायटल ट्रॅकने सध्या सर्वांनाच प्रेमात पाडले आहे. 

त्यामुळे प्रेक्षकांचा कल रणबीरकडे झुकतोय की काय अशी चर्चा होती. परंतु आता अजयने चांगलीच मुसंडी मारत आपल्या चित्रपटासाठी ब्रिटिश बॉय बॅण्ड ‘द वॅम्प्स’ला पाचारण केले आहे. तरुणांमध्ये प्रचंड लोकप्रिय असलेला हा बॅण्ड ‘शिवाय’साठी एक गाणं गाणार आहे.

Ajay With The vamps

गाण्याच्या रेकॉर्डिंगचा एक छोटासा व्हिडिओदेखील त्याने शेअर केला आहे. गाण्याचे बीट्स, त्याची एनर्जी पाहून असे वाटते की, हे गाणे यंगस्टर्समध्ये नक्कीच हीट होणार. याला आता ‘ए दिल...’ काय उत्तर देतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.
{{{{twitter_post_id####}}}}

Web Title: Ajay's 'Forward' song for 'The Vampes'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.