बाहुबलीच्या दिग्दर्शकासोबत काम करणार अजय देवगण, समोर आली प्रोजेक्टची डिटेल्स

By गीतांजली | Published: November 11, 2020 04:27 PM2020-11-11T16:27:25+5:302020-11-11T16:32:03+5:30

चित्रपटसृष्टीत अजय देवगणचे वेगळे स्थान आहे.

Ajay devgn to work with bahubali director in rrr motion poster viral | बाहुबलीच्या दिग्दर्शकासोबत काम करणार अजय देवगण, समोर आली प्रोजेक्टची डिटेल्स

बाहुबलीच्या दिग्दर्शकासोबत काम करणार अजय देवगण, समोर आली प्रोजेक्टची डिटेल्स

googlenewsNext

अभिनेता अजय देवगणने आपल्या अभिनयाच्या जोरावर रसिकांच्या मनात एक वेगळी जागा निर्माण केली आहे.हिरो म्हणून अजय देवगण आता फक्त बॉलीवूडपुरता मर्यादित राहिलेला नाही, आता त्याला साऊथच्या इंडस्ट्रीतूनही बर्‍याच चांगल्या ऑफर्स येत असतात. अजय देवगण बाहुबलीचे दिग्दर्शक एस.एस. राजामौली यांच्यासोबत एका चित्रपटात काम करत आहे. राजामौली त्यांचा मेगा बजेट प्रोजेक्ट आरआरआरवर काम सुरू करणार आहे. अजय देवगणलाही या सिनेमाच महत्त्वाची भूमिका देण्यात आली आहे.

बाहुबलीच्या दिग्दर्शकासह अजय देवगण करणार काम 
राजामौली यांच्या या महत्वाकांक्षी सिनेमा अजयची भूमिका काय असेल, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही, पण अजयशिवाय ही कथा पुढे जाऊ शकत नाही, असे सांगण्यात येत आहे. स्वत: एस.एस. राजामौली देखील अजय देवगणसोबत काम करताना खूप आनंदित आहे. एका न्यूज पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत राजामौली म्हणाले,आरआरआरमध्ये अजयचे पात्र खूप महत्वाचे आहे. मला एक कलाकार हवा होता ज्याचा प्रत्येत शब्द सत्य असेल. मला असा अभिनेता हवा आहे ज्यावर संपूर्ण देश विश्वास ठेवू शकेल. जेव्हा मी हे शोधण्यास सुरूवात केली, तेव्हा प्रत्येकाने अजय देवगनचे नाव घेतले.

चित्रपटसृष्टीत अजय देवगणचे वेगळे स्थान आहे.  असे म्हटले जाते की राजामौली गेली आठ वर्षे अजय देवगण सोबत एक चित्रपट करू इच्छित आहेत. परंतु तारखा नसल्यामुळे कोणत्याही प्रोजेक्टचे काम कधीच सुरू होऊ शकले नाही. एकीकडे अजय आपल्या बॉलिवूड चित्रपटांमध्ये व्यस्त होता, तर दुसरीकडे राजामौली बाहुबलीमध्ये बिझी होते. पण आता हे दोन दिग्गज एकत्र येण्यास तयार आहेत. आरआरआर चे एक मोशन पोस्टर देखील रिलीज केले गेले आहे. या सिनेमात आलिया भट्ट देखील महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसणार आहे.

Web Title: Ajay devgn to work with bahubali director in rrr motion poster viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.