सलमान खानसोबत नाही तर आमीर खानसोबत काम करायचंय अजय देवगणला !

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2017 10:43 IST2017-09-05T05:12:29+5:302017-09-05T10:43:30+5:30

90 च्या दशकात आमीर खान आणि अजय देवगण दिग्दर्शक इंदर कुमारच्या इश्क याचित्रपटात एकत्र दिसले होते. चित्रपटातील दोघांची मैत्री ...

Ajay Devgan wants to work with Aamir Khan, not Salman Khan | सलमान खानसोबत नाही तर आमीर खानसोबत काम करायचंय अजय देवगणला !

सलमान खानसोबत नाही तर आमीर खानसोबत काम करायचंय अजय देवगणला !

90
्या दशकात आमीर खान आणि अजय देवगण दिग्दर्शक इंदर कुमारच्या इश्क याचित्रपटात एकत्र दिसले होते. चित्रपटातील दोघांची मैत्री सगळ्यांना फारच भावली होती. त्यानंतर मात्र अजय आणि आमीरची जोडी एकाही चित्रपटात एकत्र दिसली नाही. हम दिल दे चुके सनम या चित्रपटात अजय देवगण सलमान खानने ही एकत्र काम केले आहे. मात्र प्रेक्षकांना भवली आहे ती अजय आणि आमीरची केमिस्ट्री. नुकतेच अजय देवगणला त्याच्या एक फॅनने ट्वीटरवर आमीरसोबत काम करण्याबाबत प्रश्न विचारला असता अजय म्हणाला संधी मिळाली तर मी नक्की आमीरसोबत काम करेन. एक इंटरव्ह्यु दरम्यान अजय देवगणने आपल्याला मल्टी स्टारर चित्रपटात काम करण्यास काहीच हरकत नसल्याचे सांगितले होते. यावरुन आपल्याला अंदाज येतो की आमीर आणि अजयची जोडी इश्कच्या सीक्वलमध्ये आपल्याला एकत्र दिसू शकते. तसेच दोघांना बरीच वर्ष प्रेक्षकांनी एकत्र बघितले नाही आहे.  

ALSO READ : मुलगी न्यासामुळे झोपेच्या गोळ्या खाऊन झोपतो अजय देवगण; पण का?

अजय देवगणचा नुकताच रिलीज झालेला चित्रपट बादशाहो बॉक्स ऑफिसवर चांगला गल्ला जमवतो आहे. मात्र दिवाळीत रिलीज होणारा अजयचा गोलमाल अगेन आणि आमिर खानचा सीक्रेट सुपरस्टार एकमेकांना बॉक्स ऑफिसवर चांगले आव्हान देणार आहेत. आमीरचा सीक्रेट सुपरस्टारमध्ये कॉमिओ आहे तरीही चित्रपटाच्या प्रमोशनसाठी तो दिवसरात्र मेहनत घेतो आहे. अजय देवगण ही आमीरच्या चित्रपटाला टक्कर देण्यास सज्ज आहे. रोहित शेट्टी दिग्दर्शित गोलमान अगेन हा मल्टी स्टारर चित्रपट आहे. गोलमाल सीरिजचा हा चौथा चित्रपट आहे. आतापर्यंत रिलीज झालेले गोलमाल सीरिजचे चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहेत. त्यामुळे गोलमाल अगेन ही बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करेल असा विश्वास चित्रपटाच्या टीमला आहे.  

Web Title: Ajay Devgan wants to work with Aamir Khan, not Salman Khan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.