अभिनेत्री असण्यासोबतच बिझनेस वुमन आहे ऐश्वर्या राय, कोट्यवधीच्या संपत्तीची मालकीण

By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2023 09:16 AM2023-11-01T09:16:48+5:302023-11-01T09:36:07+5:30

ऐश्वर्या आताश: मोजक्या चित्रपटात दिसते. पण अतिशय अलिशान व विलासी आयुष्य जगते.

Aishwarya rai bachchan birthday bollywood actress career films education lifestyle unknown facts | अभिनेत्री असण्यासोबतच बिझनेस वुमन आहे ऐश्वर्या राय, कोट्यवधीच्या संपत्तीची मालकीण

अभिनेत्री असण्यासोबतच बिझनेस वुमन आहे ऐश्वर्या राय, कोट्यवधीच्या संपत्तीची मालकीण

विश्वसुंदरी ऐश्वर्या राय. विलक्षण सौंदर्यवती. १ नोव्हेंबर हा तिचा वाढदिवस. आज ती ५०वा वाढदिवस साजरा करतेय. पन्नाशी जवळ आली तरी ऐश्वर्या तितकीच देखणी आणि आकर्षक दिसते. आजही तिला पाहून चाहत्यांच्या हृदयाचे ठोके हे वाढल्याशिवाय राहत नाही.  दाक्षिणात्य कुटुंबात जन्मलेली ऐश्वर्या मूळची मल्याळम. पण तिचा जन्म कर्नाटकातील मंगळूरचा. ऐश्वर्याच्या जन्मानंतर राय कुटुंब मुंबईत स्थायिक झाले.

 मोजक्या चित्रपटात दिसते. पण अतिशय अलिशान व विलासी आयुष्य जगते. याच कारण ऐश्वर्या फक्त अभिनेत्री नाही तर यशस्वी बिझनेसवुमन आहे. त्यामुळेच हातात कोणताही सिनेमा नसताना देखील ती बक्कळ कमाई करते.

ऐश्वर्या राय बॉलिवूडच्या हायेस्ट पेड अ‍ॅक्ट्रेसेसपैकी एक आहे. रिपोर्टनुसार, एका सिनेमासाठी ती 10 ते 12 कोटी रूपये मानधन घेते. मानधनाचा आकडा तिच्या भूमिकेवर अवलंबून असतो. पण आधी म्हटल्यानुसार, ऐश्वर्या एक सक्सेसफुल बिझनेसवुमन आहे. तिने अनेक स्टार्टअप्समधअये करोड रुपयांची गुंतवणूक केली आहे. Ambee नावाच्या कंपनीत तिने सुमारे एक कोटींची गुंतवणूक केली आहे. हेल्थकेअर स्टार्टअप पॉसिबलमध्येही तिची गुंतवणूक आहे. एक ना अनेक स्टार्टअप प्रोजेक्टमध्ये तिची गुंतवणूक आहे. अनेक कंपन्यांसाठी ब्रँड एम्बेसेडर म्हणून तिने काम केलं आहे, करते आहे.  मुंबईतील वांद्रे येथे तिचा आलिशानं बंगला आहे. दुबईमध्येही तिनं आलिशान घर खरेदी केलं आहे.  मीडिया रिपोर्टनुसार, ऐश्वर्या एकूण 775 करोड रुपयांची मालकीण आहे.

 दरवर्षी ब्रँड एंडोर्समेंट्समधून ती सुमारे 80-90 कोटी कमावते. तिची एक दिवसाची कमाई 6 ते 7 कोटी रूपये आहे. ऐश्वर्याने रिअल इस्टेटमध्येही चांगली इव्हेस्टमेंट केली आहे. त्यातूनही तिच्याकडे महिन्याला लाखो रुपये येत असतात. 

ऐश्वर्या अलिशान गाड्यांची मालकीण आहे. तिच्याकडे एक शानदार रोल्स रॉयस घोस्ट आहे, या गाडीची किंमत 7.95 कोटी आहे. याशिवाय  1.60 कोटी रुपयांचीमर्सिडीज बेंझ एस 350 डी कूप,  ऑडी ए8एल लेक्सस एलएक्स 570 आणि 1.58 कोटी रुपयांची मर्सिडीज-बेंझ एस500 तिच्या मालकीची आहे.  2007 मध्ये ऐश्वर्याने अभिषेक बच्चनशी लग्न केलं. लग्नानंतरही काही वर्ष ऐश्वर्या काम करत होती.मात्र त्यानंतर लेकीच्या जन्मानंतर ऐश्वर्याचा इंडस्ट्रीतील वावर कमी झाला. त्यानंतर मात्र ती अनेक जाहिरातीमध्ये काम करताना दिसली.  
 

Web Title: Aishwarya rai bachchan birthday bollywood actress career films education lifestyle unknown facts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.