Join us

Air India Plane Crash: "ज्यांनी जीव गमावला, त्यांना.."; अहमदाबाद विमान दुर्घटनेमुळे बॉलीवूड कलाकारांनी व्यक्त केली हळहळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2025 15:51 IST

Bollywood Celebs on Ahmedabad Plane Crash: अहमदाबादमध्ये झालेल्या भीषण अपघातानंतर बॉलिवूड कलाकारांना धक्का बसून त्यांनी त्यांची खंत सोशल मीडियावर व्यक्त करुन भावुक पोस्ट लिहिली आहे

Air India Plane Crash: देशातून एक मोठी बातमी समोर येतेय ती म्हणजे गुजरातच्या अहमदाबादमध्ये मोठा विमान अपघात झाला आहे. विमान कोसळून हा अपघात झाला असून  या विमान अपघाताचे भयावह फोटो आणि व्हिडीओही समोर येत आहेत. या विमानात तब्बल २४२ प्रवासी होते. या अपघातामुळे सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. प्रवासी सुखरुप आहेत की नाही, याविषयी माहिती अद्याप समोर यायची आहे. दरम्यान या विमान अपघातामुळे बॉलिवूड कलाकारांनी पोस्ट लिहून त्यांचं दुःख व्यक्त केलं आहे.

सनी देओलअहमदाबाद दुर्घटनेविषयी काय म्हणाला

सनी देओलने x वर विमान अपघात दुर्घटनेविषयी कळताच त्याची भावना व्यक्त केली, "अहमदाबाद विमान अपघात दुर्घटनेची बातमी ऐकताच मला मोठा धक्का बसला आहे. जे लोक या अपघातात सुखरुप आहेत त्यांच्यासाठी मी प्रार्थना करतो. अशा लोकांना शोधून त्यांच्यावर योग्य ते उपचार करण्याची गरज आहे. याशिवाय या अपघातात ज्यांनी आपला जीव गमावला त्यांच्या आत्म्याला शांती मिळो. या कठीण समयी त्यांच्या कुटुंबाला ईश्वर शक्ती देवो", अशा शब्दात सनी देओलने त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

अक्षय कुमारने पोस्ट करुन लिहिलंय की, " एअर इंडियाच्या अपघाताने मला धक्का बसला आहे. मी स्तब्ध आहे. सध्या सर्वांसाठी माझी प्रार्थना करत आहे." परिणीती चोप्राने पोस्ट करुन लिहिलंय की, "आज एअर इंडियाच्या दुर्दैवी विमान अपघातानंतर कुटुंबियांना किती दुःख झाले असेल याची कल्पनाही करू शकत नाही. या काळात देवाने त्यांना शक्ती द्यावी अशी प्रार्थना करते." 

Ahmedabad Plane Crash: विमान दुर्घटनेमुळे सलमान खानने घेतला मोठा निर्णय, म्हणाला-आर. माधवन पोस्ट करुन लिहितो की, "एआय १७१ — धक्कादायक आणि हृदयद्रावक... प्रचंड दुःख.. या अपघातात ज्यांनी जीव गमावला आणि जे सुखरुप आहेत त्या सर्वांसाठी माझ्या प्रार्थना..", अभिनेत्री रुपाली गांगुलीने पोस्ट करुन लिहिलंय की, "अहमदाबादमधील विमान अपघाताची दृश्य हृदयद्रावक आहेत, सर्व प्रवासी आणि क्रू सदस्यांच्या सुरक्षिततेसाठी मनापासून प्रार्थना."

 

 

अहमदाबाद विमान दुर्घटना

अहमदाबादमध्ये झालेल्या विमान अपघातानंतर त्या भागातील मेघानी परिसरात आगीच्या मोठ्या ज्वाळा दिसत आहे. तसेच दूरवरून काळ्या धुराचे ढग दिसत आहेत. माध्यमांच्या वृत्तानुसार हे एक प्रवासी विमान होते. मिळालेल्या माहितीनुसार, सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावर हा दुर्दैवी अपघात झाला. लंडनला जाणारे हे प्रवासी विमान विमानतळाजवळच कोसळले. समोर आलेल्या फोटोंमधून विमानाचे तुकडे झाले असल्याचे दिसून येते. मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. सर्वांना या दुर्घटनेमुळे मोठा धक्का बसला आहे. दरम्यान विमानात असलेले २४२ प्रवाशांविषयी

टॅग्स :विमान दुर्घटनाअहमदाबादसनी देओलबॉलिवूडगुजरातएअर इंडियाअपघातअक्षय कुमारपरिणीती चोप्रासेलिब्रिटी