​‘अहान सुनील शेट्टी’ करणार बॉलिवूडमध्ये एंट्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2016 18:56 IST2016-11-04T18:56:15+5:302016-11-04T18:56:15+5:30

आथिया शेट्टीनंतर सुनील शेट्टीचा मुलगा अहान लवकरच मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. चित्रपट निर्माता व दिग्दर्शक साजिद नाडियाडवालाच्या आगामी चित्रपटातून ...

'Ahaan Sunil Shetty' to enter Bollywood | ​‘अहान सुनील शेट्टी’ करणार बॉलिवूडमध्ये एंट्री

​‘अहान सुनील शेट्टी’ करणार बॉलिवूडमध्ये एंट्री

िया शेट्टीनंतर सुनील शेट्टीचा मुलगा अहान लवकरच मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. चित्रपट निर्माता व दिग्दर्शक साजिद नाडियाडवालाच्या आगामी चित्रपटातून अहान बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. अहानच्या अपोझिट कोण अभिनेत्री असेल याचीही चर्चा रंगली आहे. 

बॉलिवूड स्टार्सची नवी पिढी बॉलिवूडमध्ये पदापर्णासाठी सज्ज झाली आहे. सैफ अली खान-अमृता सिंग यांची मुलगी सारा खान, बोनी कपूर-श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूर किंवा सनी दओलचा मुलगा करण असो हे सर्व लवकरच बॉलिवूडमध्ये पदापर्ण करणार असल्याचे  सांगण्यात येते. बॉलिवूडमधील काही निर्माते नव्या जनरेशनसोबत चित्रपटाची प्लॉनिंग करीत आहेत यात साजिद नाडियाडवाला यांचा समावेश आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार साजिदच्या आगामी चित्रपटात सुनील शेट्टीचा मुलगा अहान शेट्टी याची महत्त्वाची भूमिका आहे. 

अहानला लाँच करण्यासाठी साजिद रोमाँटिक अ‍ॅक्शन चित्रपटाची निवड केली आहे. या चित्रपटाच्या पटकथेवर काम सुरू आहे. अहानच्या पदापर्णाचा चित्रपट चांगल्या पद्धतीने हाताळता यावा यासाठी चांगल्या दिग्दर्शकाचा शोध सुरू आहे. अहान सध्या अमेरिकेत चित्रपट निर्मिती आणि अभिनयाचे धडे घेत आहे. सोबतच तो आपल्या शरीरावर कसून मेहनत घेत आहे. डान्स व स्पष्ट डायलॉग यावे यासाठी तो संवाद कलेवरही भर देत असल्याचे सांगण्यात येते. 

अहान शेट्टीचा आवडता स्टार टायगर श्रॉफ असल्याचे सांगण्यात येते. विशेष म्हणजे टायगरलादेखील पहिला ब्रेक साजिद नाडियाडवाला यांनीच दिला होता. अहानची बहीण आथिया हिला सलमान खानने ब्रेक दिला होता. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी एका पार्टीत अहान दिसल्यावर तो लवकरच चित्रपटात पदार्पण करणार आहे याची चर्चा रंगली होती. 

Web Title: 'Ahaan Sunil Shetty' to enter Bollywood

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.