कंगना राणौतनंतर पायल घोषलादेखील पाहिजे Y दर्जाची सुरक्षा, जीवाला धोका असल्याचे सांगितले कारण

By तेजल गावडे | Published: September 29, 2020 05:27 PM2020-09-29T17:27:54+5:302020-09-29T17:29:49+5:30

अभिनेत्री पायल घोषने दिग्दर्शक अनुराग कश्यपच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर आता तिने वाय दर्जाच्या सुरक्षेची मागणी केली आहे.

After Kangana Ranaut, Payal Ghosh should also have Y level security, because he said there is a danger to life | कंगना राणौतनंतर पायल घोषलादेखील पाहिजे Y दर्जाची सुरक्षा, जीवाला धोका असल्याचे सांगितले कारण

कंगना राणौतनंतर पायल घोषलादेखील पाहिजे Y दर्जाची सुरक्षा, जीवाला धोका असल्याचे सांगितले कारण

googlenewsNext

अभिनेत्री पायल घोष सध्या चर्चेत आली आहे. नुकतेच पायलने बॉलिवूड निर्माता आणि दिग्दर्शक अनुराग कश्यपवर लैंगिक शोषणाचा आरोप करत वर्सोवा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. सोमवारी पायल आणि तिचे वकील नितीन सुतपुते यांनी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची मुंबईत भेट घेतली. आज पायलने मुंबईचे गव्हर्नर भगत सिंग किशोरी यांना भेटून वाय दर्जाची सुरक्षेची मागणी केली आहे. तिचे म्हणणे आहे की, जेव्हापासून अनुराग कश्यप यांच्याविरोधात तक्रार दाखल केल्यापासून तिला धमकी मिळत आहे. 


अभिनेत्री पायल घोषचे वकील नितीन यांनी ट्विटर हँडलवर एक ट्विट करत या भेटीबद्दल सांगितले. नितीन यांनी ट्विटमध्ये लिहिले की, पायल आणि तिचे वकील नितीन आज १२.३० वाजता राजभवनमध्ये गव्हर्नर भगत सिंग किशोर यांना भेटलो. आम्ही त्यांना पायल घोष यांच्यासाठी वाय दर्जाची सुरक्षा देण्यासाठी पत्र पाठवणार आहे. कारण त्यांच्या जीवाला धोका आहे.

काय आहे हे प्रकरण
आईएएनएसला दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्री पायलने 2014 मधील घटनेविषयी खुलासा केला आहे. पायलने सांगितले की, 2014 मध्ये अनुराग कश्यपने माझा विनयभंग केला. दिग्दर्शकाने मला सांगितले की, त्याच्यासोबत काम करणार्‍या मुली त्याच्याबरोबर 'गाला टाइम' घालवतात. पायल म्हणाली की, अनुराग त्यावेळी बॉम्बे वेलवेटवर काम करत होता. रणबीर कपूरबरोबर फक्त एकच चित्रपट करण्यासाठी मुली त्याच्याबरोबर झोपायला तयार असल्याचेही कश्यपने तिने सांगितले. यानंतर, अनुरागने एक प्रौढ चित्रपट दाखवण्यास सुरूवात केली. मला भीती वाटायला लागली. यानंतर, तो अचानक माझ्या समोर नग्न झाला आणि मला माझे कपडे काढण्यास सांगितले. मी म्हणाले सर मला काही कंफर्टेबल नाही वाटत असे सांगितले असल्याचा खळबळजनक खुलासा पायलने केला.


ती पुढे म्हणाली की, अनुरागने सांगितले की मी काम केलेल्या अभिनेत्री फक्त एका कॉलवर माझ्याकडे येण्यास तयार आहेत. मग मी पुन्हा म्हणाले की, मला कंफर्टेबल नाही वाटत आणि मी आजारी आहे. कसं तरी मी तिथून पळाले. यानंतर मी त्याला कधीच भेटले नाही. त्याने मला बर्‍याच वेळा भेटण्यास सांगितले. मी आजपर्यंत ती घटना विसरू शकले नाही आणि यामुळे मला खूप त्रास होतो, असं पायलने सांगितलं असल्याची माहिती दैनिक भास्करने दिली आहे.


 

Web Title: After Kangana Ranaut, Payal Ghosh should also have Y level security, because he said there is a danger to life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.