लग्नाच्या २० वर्षांनंतर दुभंगले नाते, अर्जुन रामपाल व मेहर जेसिया विभक्त!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2018 11:19 IST2018-05-28T05:46:35+5:302018-05-28T11:19:15+5:30

ऋतिक रोशन आणि सुजैन खान यांच्या घटस्फोटाची बातमी आता बरीच जुनी झाली. पण आता ऋतिक व सुजैन या दोघांच्या ...

After 20 years of marriage, Debangal Relation, Arjun Rampal and Mehr Jesia divider !! | लग्नाच्या २० वर्षांनंतर दुभंगले नाते, अर्जुन रामपाल व मेहर जेसिया विभक्त!!

लग्नाच्या २० वर्षांनंतर दुभंगले नाते, अर्जुन रामपाल व मेहर जेसिया विभक्त!!

िक रोशन आणि सुजैन खान यांच्या घटस्फोटाची बातमी आता बरीच जुनी झाली. पण आता ऋतिक व सुजैन या दोघांच्या अतिशय जवळचे मित्र असलेले अर्जुन रामपाल व मेहर जेसिया यांच्या विभक्त होण्याची बातमी आहे. होय, २० वर्षांचा संसार तोडत दोघांनी एकमेकांपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतलाय. आज दोघांनीही आपला हा निर्णय जाहीर केला.  ‘२० वर्षांचा सुंदर प्रवास आणि गोड आठवणीनंतर आम्ही विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. कदाचित वेगवेगळ्या वाटा निवडण्याची वेळ आली आहे. इथपर्यंत आम्ही पोहोचलो पण इथून पुढे आम्हाला एक नवा प्रवास सुरू करायचा आहे. आम्ही दोघेही अतिशय खासगी आयुष्य जगत आलो आहोत. विभक्त होण्याचा निर्णय जाहिर करतानाही विचित्र भासत आहे.  पण आमच्या आयुष्यातील परिस्थितीच अशी आहे की, जिथे सत्य विकृत होण्याचा धोका आहे. आम्ही विभक्त होत असलो तरी आमच्या मनातील एकमेकांप्रतिचा आदर, प्रेम कायम असेल. नेहमी एकमेकांसाठी आम्ही उभे असू. आमच्या दोन्ही मुली महाइका आणि मायरा यांच्यासाठीची आमची कर्तव्ये आम्ही एकत्रित निभवू. नाती संपू शकतात पण प्रेम कधीच संपू शकत नाही. आमचे खासगीपण जपण्यासाठी आभार. आम्ही यानंतर कधीच याविषयावर बोलणार नाही,’ असे अर्जुन व मेहर यांनी आपल्या संयुक्त बयानात म्हटले आहे.

१९९८ मध्ये अर्जुन व मेहर यांनी लग्न केले होते. दोघांनाही महाइका व मायरा नावाच्या दोन मुली आहेत. महाइका १६ वर्षांची आहे. तर मायरा १३ वर्षांची आहे. अर्जुन व मेहर या दोघांनी कायदेशीर घटस्फोटासाठी अर्ज केला की नाही, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. तसेच अर्जुन व मेहर यांच्या विभक्त होण्यामागचे कारणही समोर आलेले नाही. 

ALSO READ :  ‘बायोपिकचा प्रवास होता खडतर’-अर्जुन रामपाल

मध्यंतरी अर्जुन व हृतिक रोशनची एक्स वाईफ सुजैन खान यांची जवळीक बॉलिवूडमध्ये चर्चेचा विषय ठरली होती. सुजैन आणि हृतिक यांच्या घटस्फोटासाठी अर्जुनचं जबाबदार असल्याचेही म्हटले गेले होते.

Web Title: After 20 years of marriage, Debangal Relation, Arjun Rampal and Mehr Jesia divider !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.