​पद्मावतीमध्ये दिसणार अदिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2016 17:48 IST2016-10-26T17:48:59+5:302016-10-26T17:48:59+5:30

संजय लीला भन्साळी यांच्या ‘पद्मावती’ या आगामी चित्रपटात अदिती राव हैदरी महत्त्वाची भूमिका साकारणार असल्याची माहिती मिळतेय. या चित्रपटात ...

Aditi will appear in Padmavati | ​पद्मावतीमध्ये दिसणार अदिती

​पद्मावतीमध्ये दिसणार अदिती

ong>संजय लीला भन्साळी यांच्या ‘पद्मावती’ या आगामी चित्रपटात अदिती राव हैदरी महत्त्वाची भूमिका साकारणार असल्याची माहिती मिळतेय. या चित्रपटात ती अलाऊद्दीन खिलजीच्या म्हणजेच रणवीर सिंगच्या पत्नीची भूमिका करणार आहे. शाहीद कपूर व दीपिका पादुकोण यांच्या या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत.
 
या चित्रपटात दीपिका पादुकोण पद्मावतीच्या, शाहीद कपूर पद्मावतीचा पती राजा रतन सिंग व रणवीर सिंग अलाऊद्दीन खिलजी तर अदिती राव हैदरी अलाऊद्दीन खिलजीच्या पत्नीची भूमिका साकारताना दिसणार आहे. या चित्रपटात राज रतन सिंग, पद्मावती व अलाऊद्दीन खिलजी यांची प्रेमकथा दाखविण्यात येणार आहे. दीपिका व रणवीर या चित्रपटात केवळ एका गाण्यामध्येच पडदा शेअर करताना दिसणार असल्याचे सांगण्यात येते. यामुळे अदिती राव हैदरीला रणवीरसोबत अधिकाधिक पडदा शेअर करायला मिळणार आहे. याची अद्याप अधिकारिक घोषणा करण्यात आली नाही. अदितीची निवड पक्की मानली जात आहे. 



सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या चित्रपटाचे शूटिंग लवकरच मेहबूब स्टुडिओमध्ये सुुरू होणार आहे. या ठिकाणी दीपिका पादुकोणवर एक गाणे चित्रित करण्यात येणार असून, यासाठी शीशमहलचा सेट तयार करण्याचे काम जोरात सुरू आहे. या गाण्यात केवळ दीपिकाच दिसणार असल्याने शाहीद व रणवीर सिंगला सध्या शूटिंगपासून दूर ठेवण्यात आले आहे. पद्मावतीची शूटिंग सुरू होण्यापूर्वीपासूनच संजय लीला भन्साळी यांना शाहीद कपूर व रणवीर सिंग यांच्या नखºयांना समोरे जावे लागले होते.

सुरुवातीला रणवीर राजा रतन सिंगची भूमिका साकारणार होता. पूर्वी अलाऊद्दीन खिलजीची भूमिका शाहीदला आॅफर करण्यात आली होती.  दीपिका व रणवीर यांची भूमिका असणारा संजय लीला भन्साळी यांचा पद्मावती हा तिसरा चित्रपट आहे. यापूर्वी त्यांनी गलियों की रासलीला रामलीला व बाजीराव-मस्तानी हे चित्रपट केले आहेत. 

Web Title: Aditi will appear in Padmavati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.