अभिनेत्री किम शर्मा गोव्यात करते एन्जॉय, समोर आले तिचे पूलमधील मस्ती करतानाचे फोटो

By गीतांजली | Published: October 14, 2020 06:13 PM2020-10-14T18:13:07+5:302020-10-14T18:42:22+5:30

वयाच्या 40 व्या वर्षी सुद्धा किमने स्वत:ला फिट ठेवले आहे.

Actress kim sharma is enjoying in goa you will be convinced of her beauty in pictures | अभिनेत्री किम शर्मा गोव्यात करते एन्जॉय, समोर आले तिचे पूलमधील मस्ती करतानाचे फोटो

अभिनेत्री किम शर्मा गोव्यात करते एन्जॉय, समोर आले तिचे पूलमधील मस्ती करतानाचे फोटो

googlenewsNext

अभिनेत्री किम शर्मा सोशल मीडियावर खूपच अॅक्टिव्ह असते. आपल्या व्हॅकेशन दरम्यानचे फोटो आणि व्हिडीओ ती चाहत्यांसोबत शेअर करत असते.किमच्या इन्स्टाग्रामवरील हॉट फोटोंमुळे चर्चेत आली आहे. तिने इन्स्टावर स्विमिंग पूलमध्ये एन्जॉय करतानाचे काही फोटो शेअर केले आहेत. सध्या किम गोव्यात आहे. गोव्यात ती पूलमध्ये एन्जॉय करताना दिसतेय. किमचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतायेत.

तिच्या चाहत्यांनी फोटोवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. वयाच्या 40 व्या वर्षी सुद्धा किमने स्वत:ला फिट ठेवले आहे. किम सोशल मीडियावर तिचे योगा आणि एक्ससाईज करतानाचे फोटो नेहमी पोस्ट करत असते.  

मोहब्बतें’ सिनेमातून किम शर्माने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या सिनेमा जबरदस्त हिट ठरला होता. किमने आपल्या फिल्मी करिअरमध्ये 18 चित्रपट केलेत. पण ‘मोहब्बतें’मधील तिची भूमिका सर्वाधिक लोकप्रिय झाली.

यशराजच्या चित्रपटातून डेब्यू करणारी किम 2008 मध्ये प्रदर्शित ‘मनी है तो हनी है’ या चित्रपटात अखेरची दिसली होती. यानंतर 2010 मध्ये ‘यगम’ या तेलगू चित्रपटात ती झळकली.पण तेव्हापासून तिच्याकडे एकही सिनेमा नाही. ‘मोहब्बतें’ फेम किम शर्मा दीर्घकाळापासून चित्रपटांपासून दूर आहे.

Web Title: Actress kim sharma is enjoying in goa you will be convinced of her beauty in pictures

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.