​अभिनेत्री बिदिशा बेजबरूआची आत्महत्या ; चर्चेत आला ‘जग्गा जासूस’!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2017 10:32 IST2017-07-19T04:42:54+5:302017-07-19T10:32:14+5:30

लोकप्रीय आसामी अभिनेत्री व गायिका बिदिशा बेजबरूआ हिने गुरूग्रामस्थित आपल्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली.सोमवारी संध्याकाळी गुरूग्रामच्या सुशांत ...

Actress Bidisha Bezbaruah commits suicide; Jagga Spokesman got discussions !! | ​अभिनेत्री बिदिशा बेजबरूआची आत्महत्या ; चर्चेत आला ‘जग्गा जासूस’!!

​अभिनेत्री बिदिशा बेजबरूआची आत्महत्या ; चर्चेत आला ‘जग्गा जासूस’!!

कप्रीय आसामी अभिनेत्री व गायिका बिदिशा बेजबरूआ हिने गुरूग्रामस्थित आपल्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली.सोमवारी संध्याकाळी गुरूग्रामच्या सुशांत लोक भागात तिचा मृतदेह सापडला. या संपूर्ण घटनेची माहिती मंगळवारी पोलिसांनी दिली.  बिदिशा ही नुकत्याच प्रदर्शित झालेल्या रणबीर कपूर स्टारर ‘जग्गा जासूस’ या चित्रपटातील अभिनेत्री असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र चित्रपटाच्या पीआर टीमने याचा इन्कार केला आहे. तिची या चित्रपटात कुठलीही भूमिका नसल्याचा खुलासा टीमने केला आहे.पण या चित्रपटात  बिदिशा अभिनेत्री कॅटरिना कैफसोबत बीहू डान्स करताना दिसली होती.डा



 अभिनेत्रीबरोबरच बिदिशा गायिकासुद्धा होती.  छोट्या पडद्यावरचा प्रसिद्ध चेहरा असलेल्या बिदिशाने अनेक टीव्ही शो होस्टही केले आहेत.बिदिशा काही दिवसांपूर्वी मुंबईतून गुरूग्राममध्ये गेली होती. बिदिशाच्या आत्महत्येचे कारण अजूनही अस्पष्ट आहे.  दरम्यान या प्रकरणी बिदिशाचा पती नीशीत झा याला  अटक करण्यात आली आहे. 
 बिदिशा ही मूळची आसामची आहे. गुरूग्राममध्ये भाड्याच्या घरात राहत होती. त्याच घरात तिचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत सापडला.  बिदिशाचे वडील सोमवारी संध्याकाळपासून तिला फोन करत होते. पण ती फोनला उत्तर देत नव्हती. वडिलांना संशय आला आणि त्यांनी बिदिशा फोन उचलत नसल्याची माहिती पोलिसांना दिली.  बिदिशा राहत असलेल्या घरी पोलिस  पोहोचले तेव्हा घरचा दरवाजा आतून बंद होता. त्यानंतर पोलीस दरवाजा तोडून आत गेल्यावर त्यांना बिदिशाचा मृतदेह पंख्याला लटकलेला आढळून आला. घटनास्थळी कुुठलीही सुसाईड नोट सापडलेली नाही.
बिदिशाने प्रेमविवाह केला होता. पण तिचे नवºयासोबत नेहमी खटके उडत होते. तिच्या नवºयाचे बाहेर अफेअर होते, असा दावा बिदिशाच्या वडिलांनी केलाआहे. बिदिशाचा मोबाइल फोन, फेसबुक आणि सोशल मीडियावरील सगळ्या अकाऊंटवरच्या संभाषणांची सध्या तपासणी सुरू झाली आहे.  
 

Web Title: Actress Bidisha Bezbaruah commits suicide; Jagga Spokesman got discussions !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.