Aryan Khan Arrest : हा फक्त पैशांचा माज आहे, पण आता...; वाचा, आर्यन खान प्रकरणी विजय पाटकर काय म्हणाले?  

By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2021 10:22 AM2021-10-04T10:22:13+5:302021-10-04T10:59:25+5:30

Aryan Khan Arrest latest updates : Mumbai Cruise Drugs Case - बॉलिवूडचा ‘किंगखान’ शाहरूख खान याचा मुलगा आर्यन खानची कालची रात्र कोठडीत गेली. ज्येष्ठ अभिनेते विजय पाटकर यांनी या प्रकरणावर परखड प्रतिक्रिया नोंदवली आहे.

actor vijay patkar reacts on aryan khan Mumbai Cruise Drugs Case | Aryan Khan Arrest : हा फक्त पैशांचा माज आहे, पण आता...; वाचा, आर्यन खान प्रकरणी विजय पाटकर काय म्हणाले?  

Aryan Khan Arrest : हा फक्त पैशांचा माज आहे, पण आता...; वाचा, आर्यन खान प्रकरणी विजय पाटकर काय म्हणाले?  

googlenewsNext
ठळक मुद्देमुंबईहून गोव्याच्या दिशेने जाणा-या एका अलिशान क्रूजवर रंगलेल्या पार्टीत आर्यन खान हजर होता. एनसीबीने या क्रूझवर छापा टाकत ड्रग्ज पार्टीचा पर्दाफाश केला.

बॉलिवूडचा ‘किंगखान’ शाहरूख खान (Shah Rukh Khan) याचा मुलगा आर्यन खानची (Aryan Khan) कालची रात्र कोठडीत गेली. काल दुपारी आर्यनला ड्रग्ज पार्टी प्रकरणी (Mumbai Cruise Drugs Case) अटक झाली. मुंबईहून गोव्याच्या दिशेने जाणा-या एका अलिशान क्रूजवर रंगलेल्या पार्टीत आर्यन खान हजर होता. एनसीबीने या क्रूझवर छापा टाकत ड्रग्ज पार्टीचा पर्दाफाश केला. यादरम्यान मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ जप्त करण्यात आले. आधी एनसीबीने आर्यनसह 8 जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं आणि नंतर त्याला अटक करण्यात आली. शाहरूखसारख्या बड्या स्टार्सचा मुलगा ड्रग्ज प्रकरणात अडकलेला पाहून याचे पडसाद उमटणे साहजिक होते. सोशल मीडियावर या प्रकरणी वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्या. आता  ज्येष्ठ अभिनेते विजय पाटकर (Vijay Patkar) यांनीही या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर आपलं मत मांडलं आहे. 
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी या संपूर्ण प्रकरणावर परखड प्रतिक्रिया नोंदवली. actor vijay patkar reacts on SRK Son aryan khan Mumbai Cruise Drugs Case

काय म्हणाले विजय पाटकर?
एका सुपरस्टारच्या मुलाला ड्रग्ज प्रकरणात अटक होणं फारच दुर्दैवी आहे. खरं तर नाट्यगृहं सुरू होणार म्हणून आम्ही आनंदात होता. पण अचानक समोर आलेलं हे प्रकरण दुर्दैवी आहे. माझ्यामते, हे जे काही घडलंय,  तो फक्त आणि फक्त पैशाचा माज आहे. आमच्याकडे पैसे आहेत, आम्ही वाट्टेल ते करू शकतो, राजकीय पातळीवरही सगळं हॅण्डल करू शकतो, हा निव्वळ माज आहे, असं विजय पाटकर म्हणाले.
 काही वर्षांपूर्वी वानखेडे स्टेडियमवरचा अख्खा एपिसोड मी पाहिलेला आहे. त्यावेळी त्या कलाकाराची वागणूक मी पाहिलेली आहे. मी समीर वानखेडे यांचे आभार मानतो कारण बºयाच वर्षांनंतर अशा धडक कारवाया होत आहेत. हे चित्र  समाधानकारक आहे. मी अनेक वर्ष इण्डस्ट्रीमध्ये काम करतोय. इंडस्ट्रातील आतल्या ब-याच मला गोष्टी माहीत आहेत. माझ्याप्रमाणे अनेकांना त्या माहित आहे. अर्थात त्या कधी सगळ्यांसमोर आल्या नव्हत्या. आम्ही आम्हाला वाटेल तसं वागू. आम्हाला कोण अडवणार? हा माज आज उतरतोय. वानखेडे यांच्यासारखे दक्ष अधिकारी आणि सरकार तो माज उतरवतंय. त्यासाठी त्यांचे अभिनंदन करायलाच हवं, असंही ते म्हणाले.  

Web Title: actor vijay patkar reacts on aryan khan Mumbai Cruise Drugs Case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.