​या अभिनेत्याने केले आहे स्कूल टिचरशी लग्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2017 11:28 IST2017-09-05T05:58:39+5:302017-09-05T11:28:39+5:30

आज शिक्षक दिन असून तो उत्साहात साजरा केला जात आहे. शिक्षक आणि विद्यार्थ्याचे नाते हे अतूट असते. प्री-स्कूलमधील टिचर ...

The actor has been married to the schoolteacher | ​या अभिनेत्याने केले आहे स्कूल टिचरशी लग्न

​या अभिनेत्याने केले आहे स्कूल टिचरशी लग्न

शिक्षक दिन असून तो उत्साहात साजरा केला जात आहे. शिक्षक आणि विद्यार्थ्याचे नाते हे अतूट असते. प्री-स्कूलमधील टिचर आणि त्यांच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांचे नाते तर खूपच वेगळे असते. तुम्हाला माहीत आहे का बॉलिवूडमधील एका प्रसिद्ध अभिनेत्याची पत्नी ही एका प्री-स्कूल शाळेतील शिक्षक असून तिने एका शाळेत नोकरी देखील केली आहे. 
बॉलिवूडमधील सेलिब्रिटी म्हटले की, त्यांचे जोडीदार देखील त्यांच्याच क्षेत्रातले असतात. काही सेलिब्रिटी आपल्या क्षेत्रापेक्षा वेगळ्या क्षेत्रातील जोडीदार पसंत करतात. त्यामुळे काही सेलिब्रिटींचे जोडीदार हे उद्योगपती, डॉक्टर अशा हुद्द्यांवर असतात. पण कोणत्या बॉलिवूड कलाकाराचा जोडीदार शिक्षक असल्याचे तुम्ही ऐकले आहे का? हो, हे खरे आहे... बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता इम्रान हाश्मीची पत्नी शिक्षिका आहे.
बॉलिवूडमध्ये सिरियल किसर म्हणून इम्रान हाश्मीला ओळखले जाते. त्याने फूटपाथ या चित्रपटापासून त्याच्या कारकिर्दीला सुरुवात केली. मर्डर या चित्रपटामुळे त्याला खऱ्या अर्थाने ओळख मिळाली. त्याने जहेर, द डर्टी पिक्चर, जन्नत असे अनेक हिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत. तो या झगमगत्या दुनियेशी संबंधित असला तरी त्याच्या पत्नीचा या क्षेत्राशी काहीही संबंध नाही. त्याची पत्नी ही टिचर असून तिचे नाव परवीन सहानी आहे. इम्रानने बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याच्या आधीपासूनच इम्रान आणि परवीन यांचे अफेअर होते. ती इम्रानच्या स्ट्रगलच्या काळात नेहमीच त्याच्या पाठिशी उभी राहिली आहे. त्यांनी साडे सहा वर्षांच्या अफेअरनंतर २००६ मध्ये लग्न केले. त्या दोघांना २०१०मध्ये मुलगा झाला. त्याचे नाव अयान असून काही वर्षांपूर्वी अयानला कर्करोग असल्याचे निदान झाले होते. अयानच्या आजारपणात इम्रान आणि परवीनने हार न पत्करता त्याच्या आजारपणाला तोंड दिले. आज अयान पूर्णपणे बरा झाला आहे.
इम्रान आणि परवीनने मुस्लीम पद्धतीने विवाह केला होता. इम्रानचे वडील मुस्लीम असून त्याची आई ख्रिश्चन आहे. परवीन आणि इम्रान बॉलिवूडमधील क्यूट कपलमधील एक कपल असून त्या दोघांना अनेक पार्टी, पुरस्कार सोहळ्यांना एकत्र पाहाता येते. 

Emran hashmi

Also Read : ​​इम्रान हाश्मी का गातोय अजय देवगनचे गुणगाण?

Web Title: The actor has been married to the schoolteacher

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.