जरिन खानच्या मते, तुम्ही टॅलेंटेड नसाल, मात्र गुडलुकिंग असाल तर बॉलिवूडमध्ये कामाची कमी नही!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2017 21:00 IST2017-03-24T15:23:09+5:302017-03-24T21:00:22+5:30

वजन वाढल्याने बॉलिवूडकरांनी हद्दपार केलेल्या जरिनला मोठ्या प्रयत्नानंतर चित्रपटात परतता आले. त्यामुळे या अनुभवातून ती बॉलिवूड इंडस्ट्रीविषयी बरेच काही ...

According to Zarin Khan, you are not talented, but if you are good luck then there is no shortage of work in Bollywood! | जरिन खानच्या मते, तुम्ही टॅलेंटेड नसाल, मात्र गुडलुकिंग असाल तर बॉलिवूडमध्ये कामाची कमी नही!

जरिन खानच्या मते, तुम्ही टॅलेंटेड नसाल, मात्र गुडलुकिंग असाल तर बॉलिवूडमध्ये कामाची कमी नही!

न वाढल्याने बॉलिवूडकरांनी हद्दपार केलेल्या जरिनला मोठ्या प्रयत्नानंतर चित्रपटात परतता आले. त्यामुळे या अनुभवातून ती बॉलिवूड इंडस्ट्रीविषयी बरेच काही शिकली असून, चित्रपटात काम कसे मिळवावे याचे सूत्र आता तिला गवसले आहे. तिच्या मते, बॉलिवूडमध्ये टॅलेंट अजिबात वाव नाही. तुम्ही कितीही टॅलेंटेड असाल मात्र गुडलुकिंग नसाल तर तुुम्हाला कुठेही काम मिळणार नाही. मात्र याउलट तुम्ही गुडलुकिंग असाल मात्र टॅलेंटेड नसाल तर तुम्हाला कामाची कमी नाही, असे ती म्हणते. 



जरिनच्या मते, बॉलिवूडमध्ये फिजिकली अपिलिंग खूप महत्त्वाची आहे. कारण जर तुम्ही सुंदर किंवा आकर्षक दिसत नसाल तर तुमच्याशी कोणीही कॉन्टॅक्ट ठेवू इच्छिणार नाही. कारण इंडस्ट्रीमध्ये एक मोठा वर्ग असा आहे, जो तुमच्या अ‍ॅक्टिंगचा कधीच विचार करीत नाही. त्यांना फक्त तुमचे शरीर सुंदर आहे का? एवढेच बघायचे असते. त्यामुळे तुमचा आकर्षक लुक असेल तर तुम्हाला कामाची कमी नाही, असेही जरिनने सांगितले. 



तिच्या आगामी प्रोजेक्टबाबत जरिन सांगतेय की, अजूनपर्यंत माझ्याकडे असे प्रोजेक्ट नाहीत, ज्यामुळे मी तुम्हाला बिझी असल्याचे सांगू शकेल. जर असे झाले असते तर माझ्यासाठी खूपच चॅलेंजिंग असते. शिवाय काम करण्यात एक वेगळीच मजा आली असते. एकाच वेळेला वेगवेगळे कॅरेक्टर साकारणे खरोखरच अवघड असते.



यावेळी जरिनने हेही स्पष्ट केले की, कम्फर्ट झोनच्या बाहेर येऊन मी चित्रपट करायला तयार आहे. सहा वर्षांपासून इंडस्ट्रीत असलेल्या जरिनने तिच्या प्रवासाविषयी समाधान व्यक्त केले. त्याचबरोबर करिअरदरम्यान आलेल्या चढउतारानंतरही समाधानी असल्याचे तिने सांगितले. 

Web Title: According to Zarin Khan, you are not talented, but if you are good luck then there is no shortage of work in Bollywood!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.