अभिषेक बच्चनची एक्स गर्लफ्रेंड राणी मुखर्जीने घेतली ऐश्वर्या राय-बच्चनची भेट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2017 22:01 IST2017-03-24T16:30:23+5:302017-03-24T22:01:26+5:30

अभिषेक बच्चन आणि राणी मुखर्जी यांच्यातील अफेअर कदाचित तुम्हाला माहीत असेलच. एकेकाळी हे दोघे एकमेकांवर एवढे प्रेम करायचे की, ...

Abhishek Bachchan's Aishwarya Rani Mukherjee took Aishwarya Rai-Bachchan gift! | अभिषेक बच्चनची एक्स गर्लफ्रेंड राणी मुखर्जीने घेतली ऐश्वर्या राय-बच्चनची भेट!

अभिषेक बच्चनची एक्स गर्लफ्रेंड राणी मुखर्जीने घेतली ऐश्वर्या राय-बच्चनची भेट!

िषेक बच्चन आणि राणी मुखर्जी यांच्यातील अफेअर कदाचित तुम्हाला माहीत असेलच. एकेकाळी हे दोघे एकमेकांवर एवढे प्रेम करायचे की, दोघांनीही लग्न करण्याचा पक्का विचार केला होता; मात्र कुठे माशी शिंकली हे कोणालाच कळाले नाही. त्यामुळे अभिषेक-राणीचे लग्न का होऊ शकले नाही, हे अजूनही कोडेच आहे. असो. या दोघांच्या प्रेमाची तुम्हाला आठवण सांगण्याचे खास कारण म्हणजे नुकतीच राणी मुखर्जी अभिषेकची पत्नी ऐश्वर्या राय-बच्चन हिला भेटण्यासाठी अभिषेकचे घर ‘जलसा’ येथे पोहोचली होती. राणीची एंट्री ऐश्वर्यालाही धक्का देणारी होती. 

एका विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ऐश्वर्याच्या वडिलांच्या निधनामुळे तिचे सांत्वन करण्यासाठी बॉलिवूडमधील अनेक नामांकित मंडळीं तथा मित्रपरिवारांनी ऐश्वर्याची जलसा येथे भेट घेतली. माना शेट्टी (सुनील शेट्टीची पत्नी) आणि कोकिलाबेन अम्बानी यांनीदेखील ऐश्वर्याची भेट घेतली; मात्र ऐश्वर्यासाठी खरी सरप्राइज राणी मुखर्जी ही ठरली. राणी जशी जलसा येथे पोहोचली तेव्हा ऐश्वर्यादेखील काही चकित झाली. 

राणीच्या या अचानक भेटीमुळे तिची प्रतिमा निश्चितच उंचावली असेल. राणीने सर्व काही विसरून ऐश्वर्याच्या दु:खात सहभागी होण्याचे दाखविलेले धाडस खरोखरच कौतुकास्पद आहे. ऐश्वर्याचे वडील कृष्णराज राय यांचे गेल्या शनिवारी मुंबई येथील लीलावती हॉस्पिटलमध्ये दीर्घ आजाराने निधन झाले होते. त्यांना जानेवारी महिन्यातच रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले होते, मधल्या काळात त्यांच्या प्रकृतीत सुधारणादेखील झाली होती; मात्र पुन्हा त्यांची तब्येत बिघडल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले होते. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. 

Web Title: Abhishek Bachchan's Aishwarya Rani Mukherjee took Aishwarya Rai-Bachchan gift!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.