‘आशिकी2’गर्ल श्रद्धा कपूरला भेटली ‘आशिकी’ गर्ल अनु अग्रवाल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2017 13:01 IST2017-04-03T07:31:14+5:302017-04-03T13:01:14+5:30

सन १९९० मध्ये आलेल्या ‘आशिकी’ या चित्रपटाने लोकांना जणू वेड लावले. अभिनेत्री अनु अग्रवाल आणि राहुल रॉय ही जोडी ...

'Aashiqui' Girl Shraddha Kapoor meets 'Aashiqui' Girl Anu Agrawal! | ‘आशिकी2’गर्ल श्रद्धा कपूरला भेटली ‘आशिकी’ गर्ल अनु अग्रवाल!

‘आशिकी2’गर्ल श्रद्धा कपूरला भेटली ‘आशिकी’ गर्ल अनु अग्रवाल!

१९९० मध्ये आलेल्या ‘आशिकी’ या चित्रपटाने लोकांना जणू वेड लावले. अभिनेत्री अनु अग्रवाल आणि राहुल रॉय ही जोडी या चित्रपटामुळे एका रात्रीत स्टार झाली. हीच अनु अग्रवाल काल रविवारी श्रद्धा कपूरसोबत दिसली.





सावळ्या वणार्ची, उंच बांध्याची आकर्षक देहबोली असलेली अनु गेल्या अनेक वर्षांपासून बॉलिवूडपासून दूर आहे. अर्थात त्याचे कारणही तसेच होते. हे कारण होते एक अपघात. होय, १९९९ मध्ये एका रात्री पाटीर्हून घरी परतत असताना अनुसोबत एक मोठा अपघात घडला होता. या अपघातामध्ये एका कारने अनुला धडक दिली होती ज्यामुळे तिचा चेहरा पूर्णपणे रक्तबंबाळ झाला होता. तो अपघात इतका भीषण होता की, भर रस्त्यात झालेल्या या अपघातानंतर अनुला कोणीही ओळखूही शकले नव्हते. त्यानंतर पोलिसांनी जखमी अवस्थेतील अनुला ब्रीच कॅन्डी रुग्णालयात दाखल केले. या अपघातानंतर अनु जवळपास २९ दिवस कोमात गेली होती आणि त्यानंतर तिला सर्वच गोष्टींचा विसर पडला. स्मरणशक्ती गेल्यानंतर अनु बिहार येथील मुंगेरस्थित प्रसिद्ध योग साधना केंद्रात गेली. जिथे तिने स्मरणशक्ती पुन्हा मिळविण्यासाठी योगसाधना केली. अनेक वर्षांच्या मेहनतीनंतर अखेर अनुची स्मरणशक्ती पूर्वपदावर येण्यास सुरुवात झाली. पण, या सर्व प्रक्रियेमध्ये बराच काळ लोटला होता. ही अनु काल विशेष फिल्म्सला ३० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आयोजित पार्टीत दिसली. ती सुद्धा ‘आशिकी2’च्या जोडीसोबत.



ALSO READ : ‘हसीना’ श्रद्धा कपूर अन् ‘दाऊद’ सिद्धांत कपूरचे असे अ‍ॅटीट्यूड तुम्ही कधी पाहिलेय

होय, श्रद्धा कपूर आणि सिद्धार्थ कपूर या दोघांसोबत अनुने मस्तपैकी फोटोग्राफर्सला पोझ दिली. एकंदर काय तर यादिवशी ‘आशिकी’ आणि ‘आशिकी2’चे मिलन झाले.

Web Title: 'Aashiqui' Girl Shraddha Kapoor meets 'Aashiqui' Girl Anu Agrawal!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.