Aamir Khanच्या 'सितारे जमीन पर'च्या शूटिंगला सुरूवात, सांगितली सिनेमाची थीम आणि रिलीज डेट

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2024 12:28 PM2024-02-15T12:28:56+5:302024-02-15T12:29:24+5:30

Aamir Khan : आमिर खानने त्याच्या 'सितारे जमीन पर' या नवीन चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात केली असून, तो याबद्दल खूप उत्सुक आहे. नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत आमिरने चित्रपटाची कथा आणि रिलीज डेटची माहिती दिली.

Aamir Khan's 'Sitare Zameen Par' shooting has started, the theme and release date of the movie has been revealed | Aamir Khanच्या 'सितारे जमीन पर'च्या शूटिंगला सुरूवात, सांगितली सिनेमाची थीम आणि रिलीज डेट

Aamir Khanच्या 'सितारे जमीन पर'च्या शूटिंगला सुरूवात, सांगितली सिनेमाची थीम आणि रिलीज डेट

 बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान(Aamir Khan)ने त्याच्या 'सितारे जमीन पर' (Sitare Zamin Par) या नवीन चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात केली असून, तो याबद्दल खूप उत्सुक आहे. नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत आमिरने चित्रपटाची कथा आणि रिलीज डेटची माहिती दिली. 'सितारे जमीन पर' हा २००७ मध्ये आलेल्या 'तारे जमीन पर' चित्रपटाचा सीक्वल आहे. २०२२ मध्ये रिलीज झालेल्या 'लाल सिंग चड्ढा'मध्ये आमिर दिसला होता, जो बॉक्स ऑफिसवर खूप फ्लॉप झाला होता. त्यानंतर आमिरने चित्रपटांमधून ब्रेक घेण्याची घोषणा केली होती.

आमिर खानला अभिनयापासून दूर राहून जवळपास दीड वर्ष उलटून गेले, पण आता तो पुनरागमन करत आहे. आमिरने त्याच्या प्रोडक्शनच्या 'लापता लेडीज'च्या स्क्रीनिंग दरम्यान त्याच्या 'सितारे जमीन पर' या नवीन चित्रपटाविषयी मीडियाला अपडेट दिले. आमिरने सांगितले की, त्याने १ फेब्रुवारीपासून या चित्रपटाचे शूटिंग सुरू केले आहे.

'सितारे जमीन पर' २०२४ च्या ख्रिसमसला होऊ शकतो रिलीज
आमिर खान म्हणाला, 'माझ्या पुढच्या चित्रपटाच्या शूटिंगला मी गेल्या आठवड्यात सुरुवात केली. आम्ही या वर्षीच्या ख्रिसमसला ते रिलीज करण्याचा प्रयत्न करत आहोत. आशा आहे की ते ख्रिसमसपर्यंत येईल. मी १ फेब्रुवारीपासून माझ्या 'सितारे जमीन पर' या नवीन चित्रपटाचे शूटिंग सुरू केले आहे.

ही असेल 'सितारे जमीन पर'ची थीम
आमिर पुढे म्हणाला, 'हा चित्रपट 'तारे जमीन पर'चा पुढचा स्तर आहे. हा भाग २ सारखा आहे. ना त्याची कथा जुन्या चित्रपटासारखी आहे, ना पात्रांची. दोघांची थीम सारखीच आहे पण फरक एवढाच आहे की 'तारे जमीन पर'च्या विपरीत 'सितारे जमीन पर' तुम्हाला हसायला लावेल. प्रसन्ना याचे दिग्दर्शन करत असून हा एक मनोरंजक चित्रपट आहे. आम्ही एकाच विषयाकडे पाहत आहोत, परंतु वेगळ्या दृष्टीकोनातून.

आमिर करतोय सनी देओलच्या 'लाहोर १९४७'ची निर्मिती
आमिरची निर्मिती असलेला 'लापता लेडीज' १ मार्चला प्रदर्शित होणार आहे. याशिवाय तो सनी देओल स्टारर 'लाहोर १९४७' या चित्रपटाची निर्मिती करत आहे, ज्याचे दिग्दर्शन राजकुमार संतोषी यांनी केले आहे. रिपोर्ट्सनुसार, या चित्रपटात सनी देओलसोबत प्रिती झिंटाला फायनल करण्यात आले आहे. तथापि, अद्याप काहीही पुष्टी नाही.

Web Title: Aamir Khan's 'Sitare Zameen Par' shooting has started, the theme and release date of the movie has been revealed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.