​आमिर खानच्या ‘कृष्ण’ साकारण्यावरून वाद! एका ट्वीटने सुरु झाले ‘महाभारत’!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2018 15:52 IST2018-03-22T10:22:24+5:302018-03-22T15:52:24+5:30

‘ठग्स आॅफ हिंदोस्तान’ या चित्रपटानंतर आमिर खान ‘महाभारत’ या बिग बजेट सिनेमात दिसणार, अशी बातमी कालचं आली. या प्रोजेक्टसाठी ...

Aamir Khan's 'Krishna' controversy! 'Mahabharat' started with a tweet! | ​आमिर खानच्या ‘कृष्ण’ साकारण्यावरून वाद! एका ट्वीटने सुरु झाले ‘महाभारत’!!

​आमिर खानच्या ‘कृष्ण’ साकारण्यावरून वाद! एका ट्वीटने सुरु झाले ‘महाभारत’!!

ग्स आॅफ हिंदोस्तान’ या चित्रपटानंतर आमिर खान ‘महाभारत’ या बिग बजेट सिनेमात दिसणार, अशी बातमी कालचं आली. या प्रोजेक्टसाठी मुकेश अंबानी १ हजार कोटींची गुंतवणूक करणार, असेही वाचायला मिळाले. पाठोपाठ या ‘महा’प्रोजेक्टमध्ये आमिर खान कृष्णाची भूमिका साकारणार, असेही या बातमीतून समोर आले आणि नेमके याचवरून ‘महाभारत’ सुरू झाले. होय, आमिर या चित्रपटात कृष्णाची भूमिका साकारणार, यावरून फ्रेंच वंशाचे राजकीय लेखक-विश्लेषक फ्रेंकॉइस गॉतियर यांनी एक  ट्वीट केले आणि या एका  ट्वीटनंतर संपूर्ण देशभर वादविवाद सुरु झाला.
‘आमिर खान एक मुस्लिम असताना त्याला हिंदुंच्या सर्वाधिक प्राचीन आणि चर्चित महाकाव्यात कृष्णाची भूमिका साकारण्याची संधी का मिळावी? काय,भाजपाही धर्मनिरपेक्षतेच्या नावावर काँग्रेसच्याच वाटेवर निघालीयं? काय मुस्लिम एका हिंदूला मोहम्मदची भूमिका साकारू देतील?’, असे  ट्वीट गॉतियर यांनी केले. त्यांच्या या  ट्वीटनंतर आमिरच्या चाहत्यांनी त्याच्या बाजूने या वादात उडी घेतली. इतकेच नाही तर बॉलिवूड गीतकार आणि लेखक जावेद अख्तर यांनीही आमिरला पाठींबा देत, गॉतियर यांच्या  ट्वीटवर तीव्र आक्षेप नोंदवला. ‘तू पीटर ब्रूक्सच्या प्रॉडक्शनमध्ये बनलेला ‘महाभारत’ पाहिला नाहीयेसं का? मला माहितीयं की, असे विचार पसरवण्यासाठी तुम्हाला कोणत्या विदेशी संस्थेकडून रसद पुरवली जाते,’ असे  ट्वीट जावेद अख्तर यांनी केले.



यानंतर गॉतियरने पुन्हा एक  ट्वीट केले. ‘आमिर खानने कृष्णाची भूमिका साकारण्यावर मी आक्षेप घेताच मला ट्रोल केले गेले आणि या ट्रोल करणा-यांमध्ये बहुसंख्य हिंदू होते. हिंदूंना लाज वाटायला हवी,’ असे त्यांनी लिहिले. 

तूर्तास ‘महाभारत’ चित्रपटाची अधिकृत घोषणा झालेली नाही. पण ब-याच दिवसांपासून या प्रोजेक्टची चर्चा आहे. हा आत्तापर्यंतचा सर्वात मोठा प्रोजेक्ट असल्याचे सांगितले जात आहे. यात आमिर व रजनीकांत स्क्रीन शेअर करणार असल्याचीही चर्चा आहे.

ALSO READ : विमानतळावरच पत्नी किरण रावकडून आमिर खानला मिळाली वाढदिवसाची ‘गोड’ भेट; तुम्हीही पाहा!!

Web Title: Aamir Khan's 'Krishna' controversy! 'Mahabharat' started with a tweet!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.