बॉलिवूडच्या ‘या’ ५ अभिनेत्रींनी ट्रीटमेंट घेऊन मिळवला गोरेपणा... जाणून घ्या कोण आहेत या अभिनेत्री...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2017 15:58 IST2017-10-03T10:28:28+5:302017-10-03T15:58:28+5:30
अबोली कुलकर्णी गोरंपान दिसणं कुणाला आवडत नाही? सर्वांनाच वाटतं आपण गोरं दिसावं. चारचौघांमध्ये उठून दिसू असा आपला चेहरा असावा, ...
.jpg)
बॉलिवूडच्या ‘या’ ५ अभिनेत्रींनी ट्रीटमेंट घेऊन मिळवला गोरेपणा... जाणून घ्या कोण आहेत या अभिनेत्री...
गोरंपान दिसणं कुणाला आवडत नाही? सर्वांनाच वाटतं आपण गोरं दिसावं. चारचौघांमध्ये उठून दिसू असा आपला चेहरा असावा, असे सर्वसामान्य युवतींना वाटते. मग, बॉलिवूडच्या अभिनेत्रींना तर वाटणारच ना ! बॉलिवूडमध्येही अशा काही अभिनेत्री आहेत ज्या त्यांच्या सुरूवातीच्या काळात सावळ्या होत्या. मग त्यांनी ‘स्किन व्हाइटनिंग ट्रीटमेंट’ करून घेतली. ही ट्रीटमेंट घरबसल्या आपण करू शकतो अशी सर्जरी असल्याने काही थोड्याच दिवसात त्यांनी गोरेपणा मिळवला. पाहूयात, कोण आहेत या अभिनेत्री...
काजोल :
बॉलिवूडची सेनोरिटा म्हणजेच काजोल देवगन ही सध्या सर्वांत हॉट दिवांपैकी एक मानली जाते. पूर्वी काजोलचा रंग हा थोडा सावळा होता. तिने करिअरला सुरूवात केली तसे तिला बरेच प्रोजेक्ट मिळत गेले. मात्र, काही काळानंतर तिने ‘स्किन अॅट होम सर्जरी’ करून घेतली. त्यामुळे तिचा रंग खूपच उजळला आणि ती गोरी दिसू लागली.
श्रीदेवी :
अनेक चित्रपटांमध्ये अभिनेत्री श्रीदेवी झळकली आहे. तिच्या अलीकडेच प्रदर्शित झालेल्या ‘मॉम’ चित्रपटातून तिने उत्तम अभिनय साकारला. मात्र, तुम्हाला माहितीये का, श्रीदेवीनेही स्किन व्हाइटनिंग ट्रीटमेंट करून घेतली आहे. तिच्या फोटोंवरून तुम्हाला लक्षात येईल.
रेखा :
रेखा हिच्यासारखी ‘बोल्ड अॅण्ड ब्युटीफुल’ अभिनेत्री बॉलिवूडमध्ये एकमेवच. जुन्या चित्रपटांमध्ये ती सावळया रंगातच दिसते आहे. मात्र, काही काळानंतर तिने स्किन व्हाइटनिंग थेरपी करून घेतली. या थेरपीनंतर तिचा चेहरा खूप उजळला.
प्रियांका चोप्रा :
बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा ही आता ग्लोबल आयकॉन बनली आहे. तिने आज जे यश संपादन केले आहे ते स्वत:च्या बळावर मिळवलेले आहे. त्यातच तिने स्किन व्हाइटनिंगची थेरपी देखील करून घेतली आहे. त्यामुळे तिच्या चेहऱ्यात एकदम बदल झाला. तिचा चेहरा एकदम उजळून निघाला.
बिपाशा बासु :
बंगाली ब्लॅक ब्युटी म्हटल्यावर बिपाशा बासुचं नाव आपण नकळत घेतो. तिने बॉलिवूडमध्ये जेव्हा करिअरला सुरूवात केली तेव्हा तिला अनेक प्रोजेक्ट मिळायचेच नाही. मग तिने स्किन व्हायटनिंग थेरपी करून घेतली. त्यानंतर तिच्याकडे चित्रपटांच्या आॅफर्सचा ओघ येऊ लागला.