अनन्या पांडेसाठी यशस्वी ठरलं २०२३ हे वर्ष, जाणून घ्या याबद्दल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2023 08:00 PM2023-12-28T20:00:36+5:302023-12-28T20:00:51+5:30

Ananya Panday : बॉलिवूड स्टार अनन्या पांडेने वैयक्तिक आणि व्यावसायिकरित्या नवीन उंची गाठत २०२३ हे वर्ष आपल्या यशांनी गाजवले. आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचे प्रतिनिधित्व करण्यापासून ते बॉक्स ऑफिसवर १०० कोटीचा बॅरिअर मोडण्यापर्यंत, अनन्या पांडेसाठी २०२३ हे वर्ष उदंड यशाचे ठरले.

2023 has been a successful year for Ananya Pandey, know about it | अनन्या पांडेसाठी यशस्वी ठरलं २०२३ हे वर्ष, जाणून घ्या याबद्दल

अनन्या पांडेसाठी यशस्वी ठरलं २०२३ हे वर्ष, जाणून घ्या याबद्दल

बॉलिवूड स्टार अनन्या पांडे(Ananya Panday)ने वैयक्तिक आणि व्यावसायिकरित्या नवीन उंची गाठत २०२३ हे वर्ष आपल्या यशांनी गाजवले. आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचे प्रतिनिधित्व करण्यापासून ते बॉक्स ऑफिसवर १०० कोटीचा बॅरिअर मोडण्यापर्यंत, अनन्या पांडेसाठी २०२३ हे वर्ष उदंड यशाचे ठरले.

अनन्या पांडे आणि आयुष्मान खुराना अभिनीत 'ड्रीम गर्ल २' हा चित्रपट २०२३ मधील सर्वात लोकप्रिय चित्रपटांपैकी एक असून, हा चित्रपट १०० कोटींचा आकडा पार करणारा अनन्याचा पहिला चित्रपट ठरला. या सिनेमात अनन्याने मथुरेतील एका छोट्या शहरातील मुलीची भूमिका साकारली आहे. अनन्याच्या या भूमिकेला दर्शकांचे प्रचंड प्रेम मिळाले आणि हा चित्रपट तिचा आजपर्यंतचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला.

आंतरराष्ट्रीय स्तरावर झळकली अनन्या
२०२३ या वर्षात अनन्या पांडे काही मोठ्या आणि लोकप्रिय ब्रँड्सचा चेहरा बनली. इतकेच नाही तर, अनन्याने किम कार्दशियन, ग्वेनेथ पॅल्ट्रो, सेरेना विल्यम्स, अ‍ॅशले ग्रॅहम आणि इतरांसोबत न्यूयॉर्क शहरातील एका कार्यक्रमात देशाचे प्रतिनिधित्व देखील केले. अशातच, दीपिका पादुकोण आणि आलिया भट्ट यांसह अनन्या पांडे केवळ भारतातीलच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही ब्रँड्सचा नवीन आवडता चेहरा बनली आहे.

अनन्याने केली नव्या घरासह नवी सुरुवात
अनन्याला वर्षभरात मिळालेल्या यशानंतर तिने स्वतःचे घर विकत घेऊन एक मोठा वैयक्तिक टप्पा गाठला. अभिनेता असो किंवा नसो, आपल्या स्वतःचे  घर घेणे हा एक महत्त्वाचा वैयक्तिक टप्पा आहे. अनन्याचे नवीन घर हे तिच्या कारकिर्दीत आणि वैयक्तिक जीवनात एक मोठे पाऊल आहे.

फॅशन क्वीन अनन्या पांडे
अनन्या पांडेची फॅशन सेन्स हे गेल्या वर्षातील प्रमुख आकर्षणांपैकी एक ठरली आहे. 'ड्रीम गर्ल 2'च्या प्रमोशन दरम्यान तसेच इतर सेलिब्रिटी इव्हेंट्स दरम्यानच्या तिच्या आकर्षक लूक्सने तिला इंडस्ट्रीतील तिच्या समवयस्कांमध्ये वेगळे केले आहे. अनन्याला एक परिपूर्ण फॅशन आयकॉन म्हणून गौरवण्यात आले आहे, मग ते पारंपारिक असो, किंवा अगदी पाश्चात्य लूक्स असोत, अनन्याने आपल्या फॅशनसह एक नवा दर्जा तयार केला आहे.

'खो गये हम कहाँ'द्वारा अनन्याने जिंकली प्रेक्षकांची मने
अनन्या पांडेची नवीन नेटफ्लिक्स रिलीज, 'खो गये हम कहाँ', प्रत्येक तरुण प्रेक्षकाला आवडेल. यामध्ये अनन्याने साकारलेल्या अहाना नावाच्या पात्राची आजपर्यंतची तिची सर्वोत्कृष्ट कामगिरी म्हणून स्तुती केली जात आहे. या चित्रपटातील तिच्या अभिनयाला ग्लॅमरस, उत्कृष्ट आणि नॅचरल म्हटले गेले आहे. अशातच, आपल्या अभिनय कौशल्याने अनन्याने सिनेरसिकांची मने जिंकली आहेत. 
 

Web Title: 2023 has been a successful year for Ananya Pandey, know about it

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.