शहिदांच्या कुटुंबीयांना अक्षय कुमारची १.०८ कोटींची मदत
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2017 10:38 IST2017-03-17T05:08:48+5:302017-03-17T10:38:48+5:30
बॉलिवूडचा खिलाडी म्हणून लोकप्रिय असलेला अभिनेता अक्षय कुमार शहीद जवानांच्या मदतीसाठी पुढे सरसावला आहे. अक्षय एक संवेदनशील कलाकार आहे. ...

शहिदांच्या कुटुंबीयांना अक्षय कुमारची १.०८ कोटींची मदत
ब लिवूडचा खिलाडी म्हणून लोकप्रिय असलेला अभिनेता अक्षय कुमार शहीद जवानांच्या मदतीसाठी पुढे सरसावला आहे. अक्षय एक संवेदनशील कलाकार आहे. याआधी महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी अक्षय कुमार पुढे सरसावला होता. त्याने दुष्काळग्रस्तांसाठी लाखो रुपयांची मदत राज्य सरकारकडे सुपूर्द केली होती. आता अक्षयने पुन्हा एकदा शहीद जवानांच्या कुटुंबाच्या मदतीसाठी हात पुढे केला आहे. नक्षलवाद्यांशी लढताना शहीद झालेल्या राज्य राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) जवानांच्या कुटुंबियांसाठी एक कोटी आठ लाख रुपयांची मदत अक्षयने दिली आहे.
गेल्या ११ मार्चला छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यात नक्षलवादी आणि सीआरपीएफ यांच्यात चकमक झाली होती. या चकमकीत सीआरपीएचे १२ जवान शहीद झाले होते. या शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबियांना प्रत्येकी नऊ लाख रुपयांची आर्थिक मदत अक्षय कुमारने केली आहे. उरी हल्ल््यातील शहिद जवानांच्या कुटुंबियांनाहीअक्षयने ८० लाखांची मदत केली होती.
ALSO READ : रोबोट-2च्या हवाई स्टंट्सची चर्चा,खिलाडी आणि ऍमी ठरणार आकर्षण
सध्या अक्षय कुमार ‘पॅडमॅन’ या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. काही दिवसांपूर्वीच पत्नी टिष्ट्वंकल खन्ना हिच्या साक्षीने अक्षयने ‘पॅडमॅन’चे शूटींग सुरु केले. या चित्रपटात अक्षयसोबत सोनम कपूर आणि राधिका आपटे यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. या चित्रपटाचे शूटींग लवकरात लवकर निपटवण्याचे अक्षयचे प्रयत्न आहे. विना ब्रेक हे शूटींग संपेल, असे सांगितले जातेय. त्यामुळे येत्या वर्षा अखेरिस हा चित्रपट रिलीजसाठी तयार असेल. ‘पॅडमॅन’ हा चित्रपट अरुणाचलम मुरुगनाथम यांच्या जीवनाचा संघर्ष व स्वस्त सॅनिटरी पॅड तयार करण्यासाठी त्यांनी घेतलेली मेहनत दाखविण्यात येणार आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख अद्यापही निश्चित झाली नसली तरीही चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये मात्र कमालीची उत्सुकता पाहायला मिळतेय.