बॉलीवूड ताऱ्यांचीमराठमोळी ‘गुंतवणूक’

By Admin | Updated: February 14, 2016 02:26 IST2016-02-14T02:26:02+5:302016-02-14T02:26:02+5:30

गेल्या दशकभरात मराठी चित्रपटसृष्टीने कात टाकली आहे. उत्तम कथानक, कलाकारांचे तगडे अभिनय आणि दर्जेदार कलाकृतींमुळे जगभरातील चित्रपट महोत्सवांमध्ये मराठी

Bollywood stars 'investment' | बॉलीवूड ताऱ्यांचीमराठमोळी ‘गुंतवणूक’

बॉलीवूड ताऱ्यांचीमराठमोळी ‘गुंतवणूक’

गेल्या दशकभरात मराठी चित्रपटसृष्टीने कात टाकली आहे. उत्तम कथानक, कलाकारांचे तगडे अभिनय आणि दर्जेदार कलाकृतींमुळे जगभरातील चित्रपट महोत्सवांमध्ये मराठी चित्रपटांनी आपले आगळेवेगळे स्थान निर्माण केले आहे. याची भूरळ बॉलीवूड स्टार्सलाही पडली असून, अनेक दिग्गज कलाकारांनी मराठी चित्रपटांच्या निर्मितीत गुंतवणूक सुरू केली आहे. मिलेनियम सुपरस्टार अमिताभ बच्चन, बॉलिवूडचा खिलाडी अक्षयकुमार, अजय देवगण, मराठमोळा रितेश देशमुख यांनी एक से बढकर एक मराठी सिनेमांची निर्मिती केल्यानंतर देसी गर्ल प्रियंका चोप्राही या निर्मात्यांच्या पंक्तीत येऊन बसणार आहे. तर मराठी चित्रपटांमध्ये हिंदीच्या तुलेनत कमी गुंतवणूक, चित्रपटासाठी मिळणारे अनुदान आणि चित्रपट फ्लॉप झाला तरीही वसुल होणाऱ्या गुंतवणुकीची जोखीम कमी असल्याचे गणितही यामागे आहेच. त्यामुळे बॉलिवूडपाठोपाठ हॉलिवूड आणि साऊथकडील निर्मिती कंपन्यांना मराठी चित्रपटसृष्टीच्या दारात रेड कार्पेट टाकून मराठी चित्रपटनिर्मितीचे डोहाळे लागले आहे.

‘विटी-दांडू’
बॉलिवूडचा सिंघम अजय देवगनची निर्मिती कंपनी अजय देवगन फिल्मसने २०१४ मध्ये ‘विटीदांड’ू या मराठी चित्रपटाची निर्मिती केली. देशभक्तीवर आधारित असलेला हा चित्रपट मराठी रसिकांच्या चांगलाच पसंतीस उतरला होता. विशेष म्हणजे या कंपनीने या चित्रपटाचे प्रमोशन रोहित शेटट्ीची निर्मिती असलेल्या सिंघम रिर्टन्सच्या टे्रलरसोबत चित्रपट गृहांमध्ये करण्यात येत होते. या चित्रपटाने बॉक्स आॅफिसवर चांगला गल्ला जमविला होता.

‘विहीर’
वळू, देऊळसारखे विषय घेऊन हिट चित्रपट देणारे दिग्दर्शक उमेश कुलकर्णी यांच्या २०१० मध्ये बर्लिन चित्रपट महोत्सवात ज्यूरींच्या पसंतीस उतरलेल्या ‘विहीर’ चित्रपटाची निर्मिती बीग बी अमिताभ बच्चन यांच्या अमिताभ बच्चन कॉर्पोरेशन लिमिटेड (एबीसीएल) ने केली आहे. या वेळी मराठी चित्रपटसृष्टीचा आलेख वाढता असून चांगले चित्रपट तयार होत असल्याने आपली कंपनी ‘विहीर’ बरोबरच आणखी चित्रपट निर्मितीसाठी उत्सुक असल्याचे बच्चन यांंनी अनेकदा सांगितले आहे.

‘बालक-पालक’, ‘यलो’ अन् ‘लय भारी’
घरात राजकीय रेलचेल असतानाही राजकारणाकडे न वळता बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाने स्वत:चे वेगळे स्थान निर्माण करणारा रितेश देशमुखही मराठी चित्रपटाच्या निर्मितीपासून दूर राहू शकला नाही. २०१३ मध्ये रितेशची निर्मिती असलेल्या बालक-पालकने मराठी सिने रसिकांची मने जिंकली त्यानंतर विशेष मुलांवर आधारित यलो आणि स्वत: रितेशचा मराठी पदार्पणात मराठीत रेकॉर्ड ब्रेक उत्पन्न मिळविणारा लय भारी महाराष्ट्रातील घराघरांत पोहोचला आहे.

व्हेंटिलेटर
बॉलिवूड हिरोबरोबरच बॉलिवूड क्वीनही मराठी चित्रपटांच्या निर्मितीच्या
पंक्तीत येऊन बसलेल्या आहेत. देसी गर्ल प्रियंका चोप्रा आपले स्वत:चे प्रोडक्शन हाऊस असलेल्या पर्पल प्लेबल पिक्चर्सच्या माध्यमातून व्हेंटिलेटर हा चित्रपट घेऊन येत आहे. त्याचे चित्रीकरणही सुरू झालेले आहे. २०१६ च्या अखेरीस हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

Exclusive: sunil.raut@lokmat.com

 

Web Title: Bollywood stars 'investment'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.