बॉलिवूडमधील फ्लॉप पदार्पण

By Admin | Updated: October 22, 2016 03:03 IST2016-10-22T03:03:28+5:302016-10-22T03:03:28+5:30

चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्यासाठी कितीतरी कलाकार अपार मेहनत घेत असतात. आपला पहिलाच चित्रपट बॉक्स आॅफिसवर सुपरहिट व्हावा आणि प्रेक्षकांनी आपल्या कामाचे

Bollywood flop debut | बॉलिवूडमधील फ्लॉप पदार्पण

बॉलिवूडमधील फ्लॉप पदार्पण

चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्यासाठी कितीतरी कलाकार अपार मेहनत घेत असतात. आपला पहिलाच चित्रपट बॉक्स आॅफिसवर सुपरहिट व्हावा आणि प्रेक्षकांनी आपल्या कामाचे कौतुक करावे असे प्रत्येक कलाकाराचे स्वप्न असते. परंतु बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत ज्यांचे पदार्पणच निराशजनक झाले. मग यामध्ये स्टारपुत्रांचादेखील समावेश आहे. पाहुयात अशाच काही कलाकारांचे बॉलिवूडमधील फ्लॉप पदार्पण....

सोनम कपूर - रणबीर कपूर (सावरीया) :
सोनम आणि रणबीरचा सावरीया हा चित्रपट कधी आला आणि गेला हे कळलेसुद्धा नाही. अनिल कपूरची मुलगी आणि ऋषी कपूरचा मुलगा असे दोघेही चित्रपटसृष्टीतल्या नावाजलेल्या घराण्यातील मुलं त्यांच्या पहिल्याच चित्रपटाची आतुरतेने वाट पाहात होते. त्याच दिवशी शाहरुख खानचा ओम शांती ओम हा चित्रपटदेखील प्रदर्शित झाला होता. प्रेक्षकांनी या नवीन जोडीकडे पाठ फिरवून किंग खानचा चित्रपट पाहणे पसंत केले.

सुरज पांचोली - आथिया शेट्टी (हिरो):
आदित्य पांचोलीचा मुलगा आणि सुनील शेट्टीची मुलगी एकत्र चित्रपटात झळकणार अशा चर्चा बॉलिवूडमध्ये रंगू लागल्या होत्या. खबर पक्की होती आणि या फ्रेश जोडीला लाँच करणार होता बॉलिवूडचा भाईजान सलमान खान. सलमानने त्याच्या हिरो या चित्रपटातून आथिया-सूरजच्या जोडीला मोठ्या पडद्यावर आणले. परंतु हा प्रयत्न फारच अयशस्वी ठरला. सलमानने हा चित्रपट यशस्वी व्हावा म्हणून प्रचंड मेहनत घेतली होती. एवढेच काय, पण, मै हूं हिरो तेरा हे गाणेदेखील त्याने या चित्रपटासाठी गायले होते. पण सल्लुची मेहनत काही कामी आली नाही. सलमानच्या काही चाहत्यांनी हा चित्रपट केवळ त्याच्या गाण्यासाठीच थिएटरमध्ये जाऊन पाहिला असावा.

राणी मुखर्जी - शदाब खान (राजा कि आयेगी बारात)
राणी आणि शदाबने राजा कि आयेगी बारात या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. हा चित्रपट चांगलाच सुपरफ्लॉप झाला. परंतु या चित्रपटानंतर राणीचे ग्रह अचानक बदलले आणि तिला अनेक चांगल्या चित्रपटाच्या आॅफर्स आल्या. आज राणी मुखर्जी हे नाव बॉलिवूडमध्ये प्रसिद्ध आहे. तर शदाब खानने ‘हे राम’ या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आणि सध्या तो काय करतोय, कुठे आहे हे कोणालाच ठाऊक नाही.

हर्षवर्धन - सैयमी (मिर्झिया ) :
अनिल कपूरचा मुलगा हर्षवर्धन बॉलिवूडमध्ये पदार्पण करीत असल्याने त्याच्याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. कपूर घराण्यालाच बॉलिवूडची पार्श्वभूमी असल्याने हर्षवर्धन नक्कीच पहिला चित्रपट गाजविणार अशा सर्वांच्याच अपेक्षा होत्या. परंतु हर्षवर्धन कपूर आणि सैयमी खेर यांच्या मिर्झिया या पहिल्याच चित्रपटाला बॉक्स आॅफिसवर अपयश मिळाले. या जोडीचा पहिलाच चित्रपट जरी आपटला तरी नक्कीच भविष्यात आपल्याला हे दोघे दमदार चित्रपटांमध्ये दिसू शकतात.

करीना कपूर - अभिषेक बच्चन (रेफ्युजी) :
अमिताभ बच्चन यांचा मुलगा आणि कपूर घराण्याची बेबो चित्रपटात एकत्र झळकणार ही बातमी समजताच सिनेवर्तुळात अनेक चर्चा रंगू लागल्या होत्या. त्याला कारणही तसेच होते, करिना कपूर आधी ऋतिक रोशनसोबत कहोना प्यार है या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार होती. या चित्रपटातील काही सीनचे शूटिंगदेखील करिनाने केले होते. परंतु अचानक बेबोने या सिनेमातून एक्झिट घेतली आणि ती रेफ्युजी या सिनेमातून अभिषेक बच्चनसोबत सिने इंडस्ट्रीत आली. मात्र रेफ्युजी बॉक्स आॅफिसवर दणक्यात आपटला.

Web Title: Bollywood flop debut

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.