मराठमोळी श्रुतीची बॉलीवूड एन्ट्री
By Admin | Updated: December 8, 2014 00:49 IST2014-12-08T00:49:36+5:302014-12-08T00:49:36+5:30
मराठीतली एक गोड अभिनेत्री श्रुती मराठे ओरिसातील प्रसिद्ध धावपटू बुधिया सिंग यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाद्वारे बॉलीवूडमध्ये पदार्पण करीत आहे

मराठमोळी श्रुतीची बॉलीवूड एन्ट्री
मराठीतली एक गोड अभिनेत्री श्रुती मराठे ओरिसातील प्रसिद्ध धावपटू बुधिया सिंग यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाद्वारे बॉलीवूडमध्ये पदार्पण करीत आहे. विशेष म्हणजे या चित्रपटात मनोज वाजपेयी तिचा सहकलाकार म्हणून पाहायला मिळणार आहे. या बुधियाने आॅलिम्पिक स्पर्धेत वयाच्या चौथ्या वर्षीच रनिंगमध्ये भाग घेतला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन सौमेंद्र पढी करीत असून, लवकरच या चित्रपटाचे शूटिंग सुरू होणार आहे. श्रुती म्हणाली की, या चित्रपटात मी बुधियाचा कोच बिरांची दास यांच्या पत्नी गीताची भूमिका साकारते आहे. गीता ही जुडो कोच आहे. बिरांची दासच्या भूमिकेत मनोज वाजपेयी दिसणार आहे. या चित्रपटात आमचे दोघांचे वैवाहिक जीवन आनंदी आहे; पण बुधियामुळे आम्ही कायम चिंतेत असल्याचे दिसेल. बुधियाला खडतर ट्रेनिंग देण्यासाठी आम्ही दोघे धडपडत असतो. त्यामुळे हा चित्रपट बघायला प्रेक्षकांनाही आवडेल, असा विश्वास श्रुतीने व्यक्त केला आहे. श्रुतीने आजवर तामिळ, कन्नड व मराठी चित्रपटांमध्ये, मराठी मालिकेत काम केले आहे.