बॉलिवूडला ‘पंजाबी कुडीं’ची

By Admin | Updated: May 1, 2017 05:32 IST2017-05-01T05:32:07+5:302017-05-01T05:32:07+5:30

बॉलिवूड ही सगळ्यात मोठी एंटरटेनमेन्ट इंडस्ट्री आहे. पण या इंडस्ट्रीला कुणाचेही वावडे नाही. दाक्षिणात्य सिनेसृष्टी असो वा पंजाबी येथील

Bollywood doll 'Punjabi Kudi' | बॉलिवूडला ‘पंजाबी कुडीं’ची

बॉलिवूडला ‘पंजाबी कुडीं’ची

-  Rupali Mudholkar -
बॉलिवूड ही सगळ्यात मोठी एंटरटेनमेन्ट इंडस्ट्री आहे. पण या इंडस्ट्रीला कुणाचेही वावडे नाही. दाक्षिणात्य सिनेसृष्टी असो वा पंजाबी येथील टॅलेंटला बॉलिवूडने कायम संधी दिली आहे. मग ते बादशहाचे गाणे असो वा हनी सिंहचे रॅप. अशात पंजाबी इंडस्ट्रीतील नट्याही बॉलिवूडमध्ये आपले नाणे चालवू शकतात. खरे तर बॉलिवूडने साऊथच्या अनेक अभिनेत्रींना संधी दिली आहे. या तुलनेत पंजाबी अभिनेत्री कमी आहेत. पण पंजाबी इंडस्ट्री हीदेखील सौंदर्याची खाण आहे. येथेसुद्धा अनेक सुंदर व गुणवान अभिनेत्री आहेत. अशाच काही पंजाबी अभिनेत्रींबाबत आपण जाणून घेणार आहोत. या अभिनेत्री बॉलिवूडमध्ये आल्या तर बॉलिवूडप्रेमींसाठी ती मोठी ट्रिट असेल, हे नक्की...

गिन्नी कपूर
गिन्नी कपूर पंजाबी इंडस्ट्रीतील एक हॉट अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. पंजाबी चित्रपटांसोबत अनेक पंजाबी अल्बममध्येही ती दिसली. तिचे अनेक चित्रपट गाजले आहेत. तिचे असंख्य चाहते तिला बॉलिवूडमध्ये पाहू इच्छितात, हे इथे सांगायलाच हवे.


जपजी खैरा
जपजीने एकापाठोपाठ एक असे अनेक हिट सिनेमे दिले आहेत. सुंदर तेवढीच प्रतिभावान अशी जपजीची ओळख आहे. जपजीलाही बॉलिवूडच्या संधीची प्रतीक्षा आहे.


ओशिन साई
ओशिन साई ही पंजाबी इंडस्ट्रीतील यंग टॅलेंट आहे. तिला आपल्या पहिल्याच चित्रपटात दिलजितसोबत काम करण्याची संधी मिळाली होती. यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिले नाही. बॉलिवूडने कायम यंग टॅलेंटला संधी दिली आहे. अशा वेळी ओशिनचा दावा तर बनतोच.

नीरू बाजवा
नीरू बाजवा ही पंजाबी इंडस्ट्रीतील गुणवान अभिनेत्री. ‘हम’ आणि ‘स्पेशल २६’ मध्ये तिने नशीब आजमावले आहे. अर्थात हे दोन्ही चित्रपट चालले नाहीत. यातील नीरूची भूमिकाही फार आकर्षक नव्हती. नीरू पंजाबी इंडस्ट्रीतील एक मोठे नाव आहे. बॉलिवूडमध्ये एक मोठा ब्रेक मिळाला तर नीरूचे नशीब पालटायला वेळ लागणार नाही.

सिमरन कौर
मिस इंडिया आणि मॉडेल सिमरन कौर अतिशय सुंदर अभिनेत्रींपैकी एक कपिल शर्माच्या ‘किस किस को प्यार करू’ या चित्रपटात ती दिसली होती. यानंतर बॉलिवूडमध्ये ती दिसली नाही. पण तिला एका मोठ्या ब्रेकची प्रतीक्षा नक्कीच आहे.


मोनिका गिल
मोनिका गिल ही मिस इंडिया वर्ल्डवाइडचा किताब जिंकलेली एक सुंदर अभिनेत्री आहे. सौंदर्यासोबत तिचा अभिनयही दमदार आहे. अलीकडे ती ‘सरदारजी 2’ या चित्रपटात दिसली होती.


श्रुती सोढी
पंजाबी चित्रपटसृष्टीतील आणखी एक आघाडीचे नाव म्हणजे श्रुती सोढी. पंजाबी इंडस्ट्रीतील बबली अशी तिची ओळख आहे. तिचे अनेक चित्रपट हिट झालेत. बॉलिवूडमध्ये तिला पाहायला मिळणे निश्चितपणे इंटरेस्टिंग असणार आहे.


मैंडी टखर
मैंडी ही पंजाबी इंडस्ट्रीत आर्टिस्टिक अ‍ॅक्ट्रेस म्हणून ओळखली जाते. तिने अनेक पंजाबी चित्रपटांत मोठ्या भूमिका साकारल्या आहेत. आपल्या स्ट्राँग इमेजमुळे तिची एक खास ओळख आहे. मैंडीने अद्याप बॉलिवूडमध्ये डेब्यू केलेले नाही. तिला ही संधी लवकर मिळो, हीच आशा करूयात.

सोनम बाजवा
अभिनेत्री सोनम बाजवा लवकरच दिलजित दोसांजच्या अपोझिट दिसणार आहे. ‘पंजाब 1984’मधील तिच्या दमदार अभिनयाची जोरदार प्रशंसा झाली. यानंतर सोनम आज पंजाबी इंडस्ट्रीतील आघाडीची अभिनेत्री बनली आहे.

Web Title: Bollywood doll 'Punjabi Kudi'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.