'मैं माधुरी दीक्षित बनना चाहती हूँ' फेम अंतरा माळी बॉलिवूडमधून आहे गायब, आता दिसते अशी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2021 08:00 AM2021-06-12T08:00:00+5:302021-06-12T08:00:00+5:30
'मैं माधुरी दीक्षित बनना चाहती हूँ' या चित्रपटातून लोकप्रिय झालेली अभिनेत्री अंतरा माळी बऱ्याच कालावधीपासून बॉलिवूडमधून गायब आहे.
मैं माधुरी दीक्षित बनना चाहती हूँ या चित्रपटातून लोकप्रिय झालेली अभिनेत्री अंतरा माळी बऱ्याच कालावधीपासून बॉलिवूडमधून गायब आहे. ती सध्या कुठे आहे आणि काय करते आहे, हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहे.
अभिनेत्री अंतरा माळी हिला बॉलिवूडमध्ये अपयश आले. तिने एकही हिट चित्रपट दिला नाही. १९९८ साली ढुंढते रह जाओगे’ या चित्रपटातून अंतराने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. २०००च्या सुरूवातीला राम गोपाल वर्माची निळ्या डोळ्यांची अभिनेत्री म्हणून अंतरा माळी ओळखली जायची.
अंतरा प्रसिद्ध छायाचित्रकार जगदीश माळी यांची लेक आहे. अंतराने सुरुवातीला तेलगू चित्रपटात काम केले. काही कालावधीनंतर तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले पण तिला यश मिळू शकले नाही. २०१० मध्ये अंतरा शेवटची ‘अॅन्ड वन्स अगेन’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली.
रोड, डरना मना है, आणि नाच या चित्रपटात काम केले. मात्र हे चित्रपट फ्लॉप ठरले. मात्र या चित्रपटातून तिला ओळख मिळाली. २००५ मध्ये ती ‘मिस्टर या मिस’ या कॉमेडी चित्रपटाची पटकथा लेखक आणि दिग्दर्शक बनली. या चित्रपटात अंतरासोबत आफताब शिवदासानी आणि रितेश देशमुख मुख्य भूमिकेत होते. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर बऱ्यापैकी यश मिळाले असले तरी समीक्षकांकडून फारशी दाद नाही मिळाली.
अंतराने आपल्या १२ वर्षांच्या कारकीर्दीत फक्त १२ चित्रपटात काम केले. त्यापैकी कोणाताच चित्रपट हिट ठरला नाही. अनेक प्रयत्न करूनही अंतराला यश आले नाही. त्यानंतर तिने बॉलिवूडमधून निरोप घेण्याचा निर्णय घेतला.
अंतराने जून, २००९मध्ये प्रियकर कुरीन यांच्याशी लग्न केले. कुरीन हे जीक्यू मॅगझिनचे संपादक आहेत. अनेक फ्लॉप चित्रपट देऊन ही कुरीन यांच्याशी लग्न केल्यानंतर अंतरा कोटींची मालकीण झाली.
२०१२ मध्ये अंतराने मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात मुलीला जन्म दिला. सध्या अंतरा आनंदी वैवाहिक आयुष्य जगत आहे.