‘बॉबी जासूस’ने उडवली हृतिकची भंबेरी

By Admin | Updated: June 29, 2014 00:01 IST2014-06-29T00:01:32+5:302014-06-29T00:01:32+5:30

मुंबईतील एका स्टुडिओमध्ये हृतिक रोशनची शूटिंग सुरू होती. त्याच वेळी एक भिकारी महिला स्टुडिओमध्ये घुसली.

'Bobby Detective' fluttered Hrithik's bumblebee | ‘बॉबी जासूस’ने उडवली हृतिकची भंबेरी

‘बॉबी जासूस’ने उडवली हृतिकची भंबेरी

>मुंबईतील एका स्टुडिओमध्ये हृतिक रोशनची शूटिंग सुरू होती. त्याच वेळी एक भिकारी महिला स्टुडिओमध्ये घुसली. हृतिककडून भिक घेतल्याशिवाय बाहेर पडणार नाही, असा हट्ट ती करीत होती. भिकारणीच्या या हट्टामुळे वातावरण तापले. ही भिकारीण हृतिकचा पिच्छा करू लागली. या भिकारणीला बाहेर हाकलून द्या, असे फर्मान हृतिकने सुरक्षारक्षकांना सोडले, परंतु एकही सुरक्षारक्षक पुढे आला नाही. आपले आदेश कुणी ऐकत नसल्याचे बघून हृतिक भांबावला. कुणीच मदतीला येण्यास तयार नव्हते. हृतिकची भंबेरी उडालेली बघून सर्वाना हसू फुटले. भिकारीणदेखील आपल्या ख:या चेह:यात समोर आली. ती तर विद्या बालन होती. ‘बॉबी जासूस’च्या शूटिंगसाठी विद्याने भिकारणीची वेशभूषा परिधान केली होती. हृतिकच नव्हे, तर राकेश रोशनही विद्याला ओळखू शकले नाहीत.

Web Title: 'Bobby Detective' fluttered Hrithik's bumblebee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.