अंकुश चौधरीच्या बर्थडेला सेलीब्रिटी फ्रेंड्स

By Admin | Updated: February 3, 2016 01:50 IST2016-02-03T01:50:21+5:302016-02-03T01:50:21+5:30

बर्थडे पार्टीचे सर्वांत जास्त आकर्षण हे मित्रांनाच असते. आपल्या फ्रेंड्सच्या बर्थडेचे प्लॅनिंग करण्यात हे फ्रेंड्सच तर पुढे असतात. आणि त्यातदेखील एखाद्या सेलिब्रिटीचा बर्थडे म्हणजे विचारूच नका.

Birthday celebrity friends of Ankush Choudhury | अंकुश चौधरीच्या बर्थडेला सेलीब्रिटी फ्रेंड्स

अंकुश चौधरीच्या बर्थडेला सेलीब्रिटी फ्रेंड्स

बर्थडे पार्टीचे सर्वांत जास्त आकर्षण हे मित्रांनाच असते. आपल्या फ्रेंड्सच्या बर्थडेचे प्लॅनिंग करण्यात हे फ्रेंड्सच तर पुढे असतात. आणि त्यातदेखील एखाद्या सेलिब्रिटीचा बर्थडे म्हणजे विचारूच नका.
‘दुनियादारी’तील सगळ्या मित्रांचा लाडका दिग्या म्हणजेच अंकुश चौधरी याने त्याचा बर्थडे सेलिब्रिटी मित्रांसोबत नुकताच धूमधडाक्यात साजरा केला. रेड टी शर्ट, ब्लू जीन्स आणि ग्रे जॅकेट अशा कूल लुकमध्ये अंकुश पाहायला मिळाला. दिग्दर्शक संजय जाधव, संगीतकार अमित राज, संतोष जुवेकर, कारिओग्राफर उमेश जाधव, अमेय खोपकर, दीपक राणे यांनी अंकुशच्या पार्टीत चार चाँद लावले. सेल्फी-मजा मस्ती आणि खास केक मागवून अंकुशचा ४०वा बर्थडे मित्रांनी दिमाखात साजरा केला. मराठी चित्रपटांतून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणाऱ्या अंकुशने वयाच्या चाळिसाव्या वर्षात पदार्पण केले आहे. आपल्या या खास क्षणांचे सेलिब्रेशन त्याने फ्रेंड्ससोबत केले.

Web Title: Birthday celebrity friends of Ankush Choudhury

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.