बिपाशा बसू -करण सिंहचे आज शुभमंगल

By Admin | Updated: April 30, 2016 01:59 IST2016-04-30T01:59:42+5:302016-04-30T01:59:42+5:30

आज (३० एप्रिलला) बिप्स व करण लग्नगाठीत अडकणार आहेत.

Bipasha Basu-Singh Lion's Today Shubhamangal | बिपाशा बसू -करण सिंहचे आज शुभमंगल

बिपाशा बसू -करण सिंहचे आज शुभमंगल

बिपाशा बसू आणि करण सिंह ग्रोवर यांच्या लग्नाचे विधी सुरू झालेत. गुरुवारी सकाळी पूजा झाली. त्यानंतर संध्याकाळी संगीत सेरेमनीत बिप्स-करण एकत्र दिसले. पूजेचे काही फोटो बिप्सने सोशल मीडियावर शेअर केलेत. करणनेही बिप्स व त्याचा एक फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला. ‘तुला भेटून माझे स्वप्न पूर्ण झाले’ असे त्याने या फोटोखाली लिहिले आहे. आज (३० एप्रिलला) बिप्स व करण लग्नगाठीत अडकणार आहेत. बंगाली पद्धतीने हा विवाह सोहळा होणार आहे. काल मेहंदी पार पडली. करणच्या ड्रेसचा रंगही बिप्सच्या
ड्रेसशी मॅच करणारा असेल. अर्थात दोघांनाही
एकमेकांच्या ड्रेसबद्दल माहिती नाही. हे दोघांसाठीही सरप्राईज असेल. लग्नापूर्वीच बिप्स व करणला भेटवस्तू मिळणे सुरू झाले आहे. दोघांचेही फिटनेस ट्रेनर आणि मित्र डियाना व सुजैन दाधीच यांनी दोघांसाठी अनेक भेटवस्तू खरेदी केल्या आहेत. बिपाशाने काही दिवसांपूर्वी याची माहिती दिली होती. आम्हा दोघांच्या
जवळच्या मित्रांनी महिनाभरात खोली भरून भेटवस्तू
खरेदी केल्या आहेत, असे
तिने सांगितले होते.

Web Title: Bipasha Basu-Singh Lion's Today Shubhamangal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.