बिग बींच्या अभिनयाने नवाज प्रभावित!
By Admin | Updated: January 16, 2016 04:42 IST2016-01-16T04:42:42+5:302016-01-16T04:42:42+5:30
आ गामी चित्रपट ‘थर्टिन’मधील अमिताभ बच्चन यांचा अभिनय पाहिल्यानंतर अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकी हा प्रभावित झाला आहे. यामुळेच त्यांना ‘द बेस्ट’ म्हटले जात असेल, हे

बिग बींच्या अभिनयाने नवाज प्रभावित!
आ गामी चित्रपट ‘थर्टिन’मधील अमिताभ बच्चन यांचा अभिनय पाहिल्यानंतर अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकी हा प्रभावित झाला आहे. यामुळेच त्यांना ‘द बेस्ट’ म्हटले जात असेल, हे त्याला पटले आहे. यावर तो म्हणाला, माझे ध्येयवाक्य आहे, ‘काम करो और दफा हो जाओ.’ नवाजुद्दीन हा रिभू दासगुप्ता यांच्या आगामी चित्रपटात अमिताभ आणि विद्या बालन यांच्यासोबत दिसणार आहे. त्याने टिष्ट्वटरवर अमिताभ बच्चन यांच्याविषयी लिहिले आहे की, ‘ट्रुली अमेझ बाय द कॅरेक्टर प्लेड बाय सिनिअर बच्चन इन थर्टिन. यामुळे तुम्ही बेस्ट असल्याची भावना आमची आहे. नवाजुद्दीन याने ‘गँग्ज आॅफ वासेपूर’, ‘द लंचबॉक्स’, ‘किक’ आणि ‘मांझी - द माउंटेन मॅन’ या चित्रपटांमध्ये भूमिका साकारलेल्या आहेत. तो सध्या कोलकाता येथे शूटिंग करत आहे.