बिग बॉस विथ कपिल
By Admin | Updated: December 26, 2014 00:34 IST2014-12-26T00:34:32+5:302014-12-26T00:34:32+5:30
असे म्हणत दबंगस्टार सलमान खान ’बिग बॉस'मध्ये एंट्री घेत होता. पण त्याच्या ऐवजी येत्या शनिवारी ‘कॉमेडी किंग’ कपिल शर्मा

बिग बॉस विथ कपिल
‘वीकेंड का वार... शनिवार...’ असे म्हणत दबंगस्टार सलमान खान ’बिग बॉस'मध्ये एंट्री घेत होता. पण त्याच्या ऐवजी येत्या शनिवारी ‘कॉमेडी किंग’ कपिल शर्मा ‘बिग बॉस-८’मध्ये दिसणार आहे. त्या दिवसाचे सूत्रसंचालन ‘कॉमेडी नाइट्स विथ कपिल’ कार्यक्रमातील दादी, गुत्थी आणि पलक यांच्यासोबत कपिल शर्मा हाताळणार आहे. सलमानचा २७ डिसेंबर रोजी वाढदिवस असल्यामुळे त्याला सेलीब्रेशन करण्यासाठी चॅनेलने आराम दिला आहे. रविवारपासून मात्र सलमान परत ‘बिग बॉस’ची सूत्रे हाती घेईल.