बिग बींचे ट्विटर अकाऊंट हॅक
By Admin | Updated: August 31, 2015 12:36 IST2015-08-31T12:07:44+5:302015-08-31T12:36:04+5:30
बॉलिवूडचे शहेनशहा अमिताभ बच्चन यांना हॅकर्सचा फटका बसला असून त्यांचे ट्विटर अकाऊंटच हॅक करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

बिग बींचे ट्विटर अकाऊंट हॅक
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ३१ - बॉलिवूडचे शहेनशहा अमिताभ बच्चन यांना हॅकर्सचा फटका बसला असून त्यांचे ट्विटर अकाऊंटच हॅक करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. खुद्द बिग बी यांनीच ही घटना उघडकीस आणली आहे.
अमिताभ बच्चन यांचे @SrBachchan हे ट्विटर अकाऊंट हॅक करण्यात आले होते व ते पॉर्न साईट्स 'फॉलो' करत असल्याचे दाखवण्यात आले. अमिताभ यांनी स्वत:च काही वेळापूर्वी ट्विट करून ही घटना उघडकीस आणली. ' माझे ट्विटर हँडल हॅक करण्यात आले असून (मी) पॉर्न साईट्स फॉलो करत असल्याचे दाखवण्यात आले आहे' असे ट्विट अमिताभ यांनी केले आहे. तसेच 'ज्याने कोणीही हे कृत्य केले असेल त्याने दुसर काहीतरी करावं, मला या गोष्टींची गरज नाही' असेही बच्चन यांनी म्हटले आहे.
वयाची सत्तरी पार केलेले अमिताभ बच्चन कामात कितीही व्यग्र असले तरी सोशल मीडियावर नेहमीच अॅक्टिव्ह असतात. 'ट्विटर' व 'फेसबूक'च्या अकाऊंटवर लाखो फॉलोअर्स असून बिग बी त्यांच्याशी नेहमीच कनेक्टेड असतात.