बिग बी-आमिर एकत्र
By Admin | Updated: August 28, 2014 02:03 IST2014-08-28T02:03:33+5:302014-08-28T02:03:33+5:30
बॉलीवूड महानायक अमिताभ बच्चन आणि मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान दोघेही लवकरच एका चित्रपटात एकत्र दिसण्याची शक्यता आहे

बिग बी-आमिर एकत्र
बॉलीवूड महानायक अमिताभ बच्चन आणि मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान दोघेही लवकरच एका चित्रपटात एकत्र दिसण्याची शक्यता आहे. सध्या या दोघांच्या सिक्रेट मीटिंगची बातमी आहे. बिग बी आणि आमिर यशराज स्टुडिओमध्ये भेटत असल्याचे कळते. याचा अर्थ यशराज बॅनर या दोघांना एकत्र घेऊन चित्रपट बनवण्याच्या तयारीत आहे. एखाद्या चित्रपटात या दोन्ही कलाकारांची उपस्थिती यश मिळवून देईल हे नक्की. आमिर आणि बिग बींच्या चाहत्यांनाही या उत्कृष्ट कलाकारांना पडद्यावर एकत्र पाहण्याची इच्छा आहे.