भट्ट कंपनीचा बोल्ड फॉर्म्युला
By Admin | Updated: April 9, 2016 02:04 IST2016-04-09T02:04:06+5:302016-04-09T02:04:06+5:30
बॉलिवूडला अनेक बोल्ड आणि ससपेन्स थ्रिलर चित्रपट देणारी भट्ट कंपनी पुन्हा एकदा ‘लव्ह गेम्स’ हा हॉट सिनेमा घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.

भट्ट कंपनीचा बोल्ड फॉर्म्युला
बॉलिवूडला अनेक बोल्ड आणि ससपेन्स थ्रिलर चित्रपट देणारी भट्ट कंपनी पुन्हा एकदा ‘लव्ह गेम्स’ हा हॉट सिनेमा घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. यापूर्वी देखील भट्ट कंपनीने ‘राज, हेटस्टोरी, जिस्म, क्रिचर डी, ब्लड मनी, मर्डर, जहर’ यासारख्या चित्रपटांची निर्मिती करून बॉलिवूडमध्ये चित्रपटांचा एक नवीन ट्रेंड आणला. भट्ट कंपनीच्या या बोल्ड फॉर्म्युल्यावर टीकाही खूप झाली. सेंसार बोर्ड आणि भट्ट कंपनी यांचे तर जणू पिंढ्यानपिढ्यापासूनचे वैरच असल्याचे बघावयास मिळाले. भट्ट कंपनीचा असा एकही बोल्ड सिनेमा नाही, ज्याला सेंसार बोर्डाने कात्री लावली नसेल. भट्ट कंपनीच्या अशाच काही चित्रपटांचा घेतलेला हा आढावा खास ‘लव्ह गेम्स’च्या निमित्ताने...
लव्ह गेम्स
८ एप्रिल रोजी रिलीज झालेल्या निर्माते महेश भट्ट यांच्या ‘लव्ह गेम्स’ या चित्रपटात बोल्ड सीन्सचा अक्षरश: भडीमार करण्यात आलेला आहे. चित्रपटाचे जेव्हा ट्रेलर रिलीज करण्यात आले तेव्हा सुरुवातीलाच किस आणि इंटीमेट सीन्सनी खळबळ उडवून दिली. मुळात चित्रपटाचा विषयच असा आहे की, त्यात बोल्ड सीन्स गरजेचेच आहेत, असा यानंतर दिग्दर्शकांनी केला. आपल्या दुनियेत खूश असणाऱ्या पार्टीतील जोडप्यांचा शोध घेणारे एक जोडपे चित्रपटात दाखविण्यात आले आहे. हे जोडपे पार्टीत भेटलेल्या इतर जोडप्यांमध्ये फुट पाडून त्यांच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित करतात. यावरून तुम्ही चित्रपटात
किती बोल्ड सीन्स चित्रित करण्यात आले असतील याची कल्पना करू शकता. पत्रलेखा, गौरव अरोरा, तारा अलिशा या स्टार कास्टभोवती संपूर्ण चित्रपट फिरतो. मॉडेलिंगपासून अभिनयाकडे वळलेला गौरव अरोरा हा या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करीत आहे. ट्रेलर रिलीजपासूनच हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.
मर्डर - हॉट चित्रपटांबाबत भट्ट कंपनीने नेहमीच त्यांच्याच चित्रपटांशी स्पर्धा केली आहे. २००३ मध्ये आलेल्या ‘जिस्म’ या चित्रपटानंतर लगेचच २००४ मध्ये निर्माता महेश भट्ट यांनी ‘मर्डर’ हा सुपर हॉट सिनेमा आणला. सिरीयल किसर इमरान हाशमीसोबत मल्लिका शेरावतने दिलेले इंटिमेंट सीन्समुळे तिला बोल्ड इमेज मिळाली. ‘भिगे ओठ तेरे, कहो ना कहो’ या गाण्यांनी प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावले होते. पुढे २०११ आणि २०१३ मध्ये या सिरीजचे ‘मर्डर-२ आणि मर्डर-३’ हे चित्रपट रिलीज झाले. या चित्रपटातदेखील बोल्ड सिन्सचा भडीमार होता.
ब्लड मनी
निर्माता मुकेश भट्ट यांच्या २०१२ मध्ये आलेल्या ‘ब्लड मनी’ या चित्रपटात देखील बोल्डनेस हा एकमेव फॉर्म्युला वापरण्यात आला होता. चित्रपटातील कुणाल खेमू, अमृता पुरी यांचे बेडरूम सीन्स चर्चेचा तसेच टीकेचाही विषय ठरले होते. चित्रपटाची कथा झटपट श्रीमंत होण्यावर आधारित होती. मात्र त्यात टाकलेला बोल्डनेसचा मसाला प्रेक्षकांना अधिक काळ चित्रपट गृहात खिळवून ठेऊ शकला नाही.
जिस्म
भट्ट कॅम्पचा ‘जिस्म’ या हॉट एॅरोटिक थ्रिलर सिरीजच्या चित्रपटाने बॉलिवूडमध्ये इंटिमेंट सिन्सची परिभाषाच बदलली आहे. २००३ मध्ये आलेल्या जिस्म या चित्रपटात बंगाली बाला बिपाशा बसू हिने दिलेले हॉट सीन्स सेलिब्रेटींमध्ये खूप गाजले होते. शिवाय जॉन अब्राहम आणि बिपाशाची केमिस्ट्री देखील प्रेक्षकांना वेड लावून गेली. पुढे २०१३ मध्ये महेश भट्ट यांनी पोर्न स्टार सनी लियोन हिला जिस्मच्या सिरीजमध्ये कास्ट करून बॉलिवूडला हादरून सोडले. सनीने चित्रपटात दिलेले सीन्स अद्यापही प्रेक्षक विसरलेले नाहीत. आता निर्माता पूजा भट्ट ही जिस्म-३ ची तयारी करीत असून, हा आतापर्यंतचा सर्वात हॉट चित्रपट असेल असे तिने जाहीरही केले आहे. हा चित्रपट २०१७ मध्ये रिलीज होण्याची शक्यता आहे.
जन्नत-२
२०१२ मध्ये रिलीज झालेल्या महेश भट्ट यांच्या ‘जन्नत-२’ या चित्रपटात इमरान हाशमी, ईशा गुप्ता, रणदीप हुडा, मनिषा चौधरी यासारखी स्टारकास्ट होती. इमरान आणि ईशाची यामध्ये चांगलीच केमिस्ट्री रंगली होती. दोघांनी दिलेले हॉट सीन्स प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले होते. चित्रपटाची कथा अवैध व्यवसायावर आधारित होती. मात्र कथेपेक्षा चित्रपटातील हॉट सीन्सचीच चर्चा अधिक झाली.
नजर
महेश भट्ट यांची पटकथा असलेला ‘नजर’ हा चित्रपट देखील पूर्णपणे बोल्ड फॉर्म्युल्यावर आधारित होता. पाकिस्तानी अभिनेत्री मीरा आणि अश्मित पटेल यांचे बेड सीन्स चर्चेचा विषय ठरले. या चित्रपटात अतिशय हॉट दृश्य चित्रित करण्यात आले होते. यामुळे मीराला टीकेचाही सामना करावा लागला.