भाग्यश्री लाइक्स सलमान ‘न्यू अवतार’

By Admin | Updated: August 2, 2015 23:52 IST2015-08-02T23:52:08+5:302015-08-02T23:52:08+5:30

सु रज बडजात्याच्या ‘मैंने प्यार किया’ या चित्रपटात सलमान खान आणि भाग्यश्री या दोघांनी सोबत काम केले आहे. भाग्यश्रीने एका गोड, निरागस मुलींची

Bhagyashree Lyrics Salman 'New Avatar' | भाग्यश्री लाइक्स सलमान ‘न्यू अवतार’

भाग्यश्री लाइक्स सलमान ‘न्यू अवतार’

सु रज बडजात्याच्या ‘मैंने प्यार किया’ या चित्रपटात सलमान खान आणि भाग्यश्री या दोघांनी सोबत काम केले आहे. भाग्यश्रीने एका गोड, निरागस मुलींची भूमिका केली आहे जिचे सलमानवर प्रेम असते. तिने नुकताच ‘बजरंगी भाईजान’ चित्रपट पाहिला. तिला सलमानचा नवीन अवतार प्रचंड आवडला. तिने त्याला त्याच्या या नवीन अवताराबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत. ती म्हणते, ‘मला चित्रपट खूप आवडला. भावनाविवश करणारा त्याचा हा नवीन अवतार अगदी वेगळा आहे. सलमानने ‘बिवी हो तो ऐसी’पासून त्याच्या करिअरची सुरुवात केली असली तरी तो ‘मैने प्यार किया’ला त्याचा पहिला चित्रपट मानतो. या चित्रपटाने प्रेक्षकांवर चांगली प्रतिमा तयार केली. भाग्यश्री-सलमान यांची उत्तम केमिस्ट्री चित्रपटातून प्रेक्षकांना पाहावयास मिळाली.

Web Title: Bhagyashree Lyrics Salman 'New Avatar'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.