पाकिस्तानी म्हटल्यामुळे चाहत्यावर भडकली गौहर खान

By Admin | Updated: June 8, 2017 17:07 IST2017-06-08T15:56:22+5:302017-06-08T17:07:19+5:30

बिग बॉस या सर्वाधिक वादग्रस्त शोच्या सातव्या सीजनची विजेती अभिनेत्री गौहर खान सोशल मीडियावर तिला पाकिस्तानी म्हटल्यामुळे चर्चेत आहे.

Bhadkali Gauhar Khan on Pakistani fanatics | पाकिस्तानी म्हटल्यामुळे चाहत्यावर भडकली गौहर खान

पाकिस्तानी म्हटल्यामुळे चाहत्यावर भडकली गौहर खान

tyle="text-align: justify;">ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि.8 - बिग बॉस या सर्वाधिक वादग्रस्त शोच्या सातव्या सीजनची विजेती अभिनेत्री गौहर खान सोशल मीडियावर तिला पाकिस्तानी म्हटल्यामुळे चर्चेत आहे. इन्स्टाग्रामवरील तिच्या एका फोटोवर कॉमेण्ट करताना एका यूझरने तिला पाकिस्तानी म्हटले. त्यावर गोहरचा संयम तुटला आणि रागाला पारावार उरला नाही. तिने लगेचच त्या चाहत्याला खडेबोल सुनावले.
गोहरने काही तिचा एक फोटो इन्स्टाग्रामवर शेयर केला होता. लूकसाठी तिने डिझायनरचे आभार मानले होते. त्यावर एकाने त्या फोटोवर कमेंट केली, तुझी टीम काल हारली त्याचे मला दुःख वाटते. पण नेक्स्ट टाइम संधी मिळेल. गौहरने या ट्रोलरला टॅग करत लिहिले, माझा देश तर भारत आहे. पण असे वाटते, की तुम्ही वेगळ्यात ग्रहावरून आले आहात. मी प्रत्येक देश, प्रत्येक धर्माचा आदर करते. पण तुमच्यासारखे लोक कधीही जिंकू शकत नाही.
फॅशनसह अभिनय क्षेत्रात स्वत:च्या हिम्मतीवर नाव कमाविणारी गौहर सोशल मीडियावर प्रचंड अ‍ॅक्टिव्ह आहे. शिवाय ती नेहमीच तिच्या चाहत्यांबरोबर सोशल मीडियावर स्पष्ट शब्दात बोलणे पसंत करते. त्यामुळेच तिच्या फोटोला मिळालेल्या या खोचक कॉमेण्टचा तिने लागलीच समाचार घेतल्याने ती चर्चेत आली आहे.
गौहरने दिलेल्या उत्तरानंतर त्या चाहत्यांची चांगलीच त्रेधातिरपट झाली असावी यात शंका नाही. गौहरच्या या उत्तराचे सध्या सर्वत्र कौतुक केले जात आहे. नेटिझन्सकडूनही तिला यासाठी सपोर्ट केला जात आहे. गौहर नुकतेच विद्या बालन फेम बेगमजान या चित्रपटात झळकली होती. चित्रपटातील तिच्या भूमिकेचे सर्वत्र कौतुकही झाले होते.

Web Title: Bhadkali Gauhar Khan on Pakistani fanatics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.