‘पोश्टर गर्ल’मधील भूमिकेमुळे अभिनयाला कलाटणी - सोनाली

By Admin | Updated: December 12, 2015 01:57 IST2015-12-12T01:57:08+5:302015-12-12T01:57:08+5:30

क्लासमेट, मितवा आणि शटर अशा हॅट्ट्रिक यशस्वी चित्रपटांमुळे यंदाचे वर्ष अप्सरा आली फेम सोनाली कुलकर्णीला चांगले गेले असून, ‘पोश्टर गर्ल’मधून नव्या वर्षांची इनिंग खेळण्यास ती सज्ज झाली आहे

Batunya actress due to the role of 'Poshter Girl' - Sonali | ‘पोश्टर गर्ल’मधील भूमिकेमुळे अभिनयाला कलाटणी - सोनाली

‘पोश्टर गर्ल’मधील भूमिकेमुळे अभिनयाला कलाटणी - सोनाली

क्लासमेट, मितवा आणि शटर अशा हॅट्ट्रिक यशस्वी चित्रपटांमुळे यंदाचे वर्ष अप्सरा आली फेम सोनाली कुलकर्णीला चांगले गेले असून, ‘पोश्टर गर्ल’मधून नव्या वर्षांची इनिंग खेळण्यास ती सज्ज झाली आहे. विविध लूक्समुळे चर्चेत असलेली या चित्रपटामधली तिची भूमिका अभिनयाला कलाटणी देणारी असल्याचे सोनाली सांगते. एक स्वतंत्र विचारांची ही एक मुलगी आहे. चित्रपटाच्या टीझरमधून ‘ती’ वेगवेगळ्या लूक्समध्ये दिसते हे खरे आहे.
पण तिचे हे लूक्स एका गाण्याच्या माध्यमातून समोर येतात. काहीसा ब्लँक कॉमेडीकडे झुकणारा महिलाकेंद्रित असा चित्रपटाचा विषय असल्याने अभिनयाला भरपूर वाव आहे. ‘टायटल रोल’च्या भूमिकेमध्ये प्रेक्षकांना सोनाली यात पाहायला मिळेल. यापूर्वी ‘बकुळा नामदेव घोटाळे’ या चित्रपटात अशाच प्रकारे आव्हानात्मक
भूमिका करण्याची संधी मिळाली होती. तशाच प्रकारची ‘पोश्टर गर्ल’मधील ही भूमिका आहे. प्रेक्षकांच्या माझ्याकडून खूप
अपेक्षा आहेत. त्या या चित्रपटाने नक्कीच पूर्ण होतील, असा विश्वासही तिने व्यक्त केला.
प्रत्येक कलाकाराची एक जर्नी ठरलेली असते. रंगभूमी प्रत्येक कलाकाराला खुणावत असते. पण तशी योग्य वेळ यावी लागते. ती मिळाली तर नक्कीच रंगभूमीवर काम करायला आवडेल, असेही ती सांगते.

Web Title: Batunya actress due to the role of 'Poshter Girl' - Sonali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.